Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजनने अनेकांना फोडलाय घाम! फोटोत लपलेली कार शोधण्यासाठी तुम्हीही लावा जोर
Optical Illusion IQ Test : इंटरनेटवर अनेक फोटो व्हायरल होतात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो तुमच्या बुद्धीला चालना देणारे असतात. तुमच्यासमोर या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्याचं आव्हान असतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो पाहिलात का?
Optical Illusion IQ Test : इंटरनेटवर अनेक फोटो व्हायरल होतात. पण ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो तुमच्या बुद्धीला चालना देणारे असतात. तुमच्यासमोर या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्याचं आव्हान असतं. कारण फोटोत लपलेल्या गोष्टी शोधण्यासाठी तल्लख बुद्धीचा वापर करावा लागतो. हे फोटो दिसयला सुंदर वाटतात पण त्यातील बारकावे शोधणे तितकच कठीण असतं. अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत अनेक गोष्टी दिखवल्या गेल्या आहेत. या फोटोत लोकांची गर्दी असल्याचं तुम्ही पाहू शकता. पण या फोटोत एक कारही लपली आहे आणि ती कार तुम्हाला शोधायची आहे. ही कार शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंदांची वेळ असणार आहे.
ऑप्टिकल इल्यूजनच्या या व्हायरल फोटोत तुम्ही पाहू शकता की, लोकांची मोठी गर्दी आहे. एका गार्डनमध्ये लोक मनोरंजन करताना दिसत आहेत. या गार्डनमध्ये लहान मुलंही खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण या लोकांच्या गर्दीत एक कार लपली आहे. ही लपलेली कार शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागणार आहे.
हे ही वाचा >> निवडणुकीआधीच ठाकरेंना मोठा धक्का... 'या' उमेदवाराने अचानक घेतली माघार, म्हणाले मी...
फोटोला आपण नीट पाहिलं तर लहान मुलं आईस्क्रीम खाण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. काही जण झाडाखाली सावलीत बसल्याचंही पाहायला मिळत आहे. परंतु, पार्कमध्ये खेळणाऱ्या लोकांमध्ये एक कार लपली आहे. हीच कार शोधण्याचं मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे. ज्यांना ही कार शोधण्यात यश आलं आहे, त्या सर्वांकडे तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हे ही वाचा >> Ajit Pawar: "लोकसभेला ताई आणि विधानसभेला...", बारामतीत अजित पवार झाले भावुक, नेमकं काय म्हणाले?
पण ज्या लोकांना या फोटोत लपलेली कार दहा सेकंदात शोधता आली नाही, त्यांनी पुन्हा प्रयत्न करावे. शर्थीचे प्रयत्न करूनही तुम्हाला या फोटोत असलेली कार शोधता आली नसेल, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण या फोटोत कार नेमकी कुठे लपली आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आईस्क्रीमच्या गाडीजवळ केलेल्या रेड सर्कलमध्ये तुम्ही या कारला पाहू शकता.