Ajit Pawar: "लोकसभेला ताई आणि विधानसभेला...", बारामतीत अजित पवार झाले भावुक, नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

Ajit Pawar On Supriya Sule : बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच अजित पवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

ADVERTISEMENT

Ajit Pawar Pawar On Supriya Sule
Ajit Pawar Pawar On Supriya Sule
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीच्या सभेत अजित पवार भावुक का झाले?

point

अजित पवारांचं सुप्रिया सुळेंबाबत मोठं विधान

point

अजित पवार भाषणात नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar On Supriya Sule : बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच अजित पवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बारामतीकरांना संबोधीत करताना अजित पवार भावुक झाले. ते म्हणाले, "जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही तो कसा चुकेल. मी मनाचा मोठेपणा दाखवला, ही माझी मोठी चूक झाली. तुम्हाला जो कौल द्यायचा तो तुम्ही दिला. त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. हा तुमचा अधिकार आहे. मला माहितीय इथे बसणाऱ्यांनी सुप्रियाला (सुप्रिया सुळे) मतदान केलं. पण ठीक आहे, मला मान्य आहे. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा..असं त्यांनी ठरवलं आहे."

अजित पवार जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, मी नौटंकी केलेली नाही. मी तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही अधिकार दाखवला आणि त्या पद्धतीने ठरवंल. आपण लोकशाही मानतो. बहुमताचा आदर केला पाहिजे. जिवाभावाच्या कार्यकर्त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. महायुतीनं ही जागा राष्ट्रवादीला सोडली. त्यामुळे आज मी अर्ज भरला आहे.दिवाळीच्या पहिल्याच दिवसाच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरला आहे. उद्या शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत अर्ज भरले जाणार आहेत. काही थोड्या जागा राहिल्या आहेत, त्यासाठी मला सहकारी मित्रांशी चर्चा करायची आहे.

हे ही वाचा >> Rajendra Gavit : पाचव्यांदा पक्ष बदलून राजेंद्र गावितांची शिवसेनेत एन्ट्री, कोणकोणत्या पक्षांचा प्रवास?

अजित पवार पुढे म्हणाले, दरवेळीप्रमाणे बारामतीकर यावेळीही माझ्या पदरात मतांचं भरभरून दान टाकतील आणि मोठ्या मताधिक्क्याने तुम्ही निवडून द्याल. मला वाटलच नव्हतं बारामतीकर आज एव्हढा मोठा प्रतिसाद देतील. महिला मनापासून प्रतिसाद देत होत्या. सर्वांचा उत्साह मी पाहिला. माझी हात जोडून विनंती आहे, हा उत्साह 20 तारखेपर्यंत टीकला पाहिजे. दिवाळी सणाच्या निमित्ताने आपल्या राज्यातील प्रत्येकाच्या जीवनात विकासाचा नवा प्रकाश आणण्यासाठी आपण प्रयत्न करू.

हे ही वाचा >> Oshin Sharma Video : इंटरनेटवर मार्केट जाम करणाऱ्या ओशिन शर्मा आहेत तरी कोण?

दिवाळीचं हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील तमाम कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना, माय माऊलिंना सर्व घटकांना आनंदाचं जावं, अशाप्रकारची प्रार्थना करतो. मी सूरच चव्हाणला भेटलो. आईच छत्र गेलं, वडिलांचं छत्र गेलं होतं. गावात त्यानं शिक्षण घ्यायला पाहिजे होतं. दुर्देवाने तो शाळेत गेला नाही. पण तो बिग बॉसमध्ये गेला आणि सर्वांना बॉसगिरी दाखवली आणि सूरज बिग बॉसचा विजेता ठरला. तमाम बारामतीकरांना महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे. त्याला एक चांगलं घर देण्याचा निर्णय घेतला आहे. सूरज आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. पुढच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी तू नव्या घरात प्रवेश करायचा. हा आपला वादा आहे. दादाचा शब्द किती खरा असतो, ते महाराष्ट्राला माहित आहे, असंही अजित पवार म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp