Cockroach In Kitchen: किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट! 'हा' सोपा उपाय करा, घरात एकही झुरळ दिसणार नाही 

मुंबई तक

ADVERTISEMENT

remedies that prevent cockroaches
how to kill cockroaches in the kitchen
social share
google news

बातम्या हायलाइट

point

झुरळांना घरातून पळवायचंय? मग 'हा' उपाय करूनच बघा

point

आता किचनमध्ये एकही झुरळ लपणार नाही, कारण...

point

झुरळांना पळवायचे घरगुती उपाय कोणते?

How To Get Rid Of Cockroaches In Kitchen: किचनमध्ये रेसिपी करताना एखादा झुरळ दिसला की, अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. कारण छोटासा झुरळ जरी असला, तर तो जेवणात पडतोय की काय? अशी भीतीच आपल्या मनात निर्माण होते. किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट झाल्यास काही जण जोरजोरात ओरडतात. म्हणजेच ते लोक झुरळांना घाबरतात. ज्या गृहिणींना किचनमध्ये असलेल्या झुरळांचा वैताग आला आहे, त्यांनी आता टेन्शन घ्यायची गरज नाहीय. कारण या झुरळांना न मारता किचनमधून बाहेर कसं काढायचं, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ADVERTISEMENT

रात्र झाल्यावर किचनमध्ये गॅसच्या वट्यावर, स्वच्छ भांड्यावर आणि अन्नपदार्थांवर झुरळांचा वावर असतो. किचनमध्ये झुरळ फिरत असल्यास आरोग्यास धोका निर्माण होई शकतो. झुरळ दिवसा फार क्वचितच दिसतात. कारण दिवसा ते छोट्याशा बिलांमध्ये लपलेले असतात. त्यामुळे झुरळांचा कायमचा नायनाट करणं शक्य होत नाही. पण आम्ही तुम्हाला झुरळांना न मारता घरातून बाहेर कसं काढायचां याचो घरगुती उपाय सांगत आहोत.

स्वच्छता ठेवणे आवश्यक

झुरळांपासून सुटका करण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. किचनमध्ये कागद असल्यास ते तिथून काढून टाका. झुरळ याच कागदांमध्ये घुसून अंडी घालतात. तुमच्या किचनमध्ये कागद ठेवलेले असल्यास ते त्वरीत बाहेर काढा.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Navratri 2024: नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 रंग! 'हे' कपडे घालून पूजा करा, घरात अखंड राहील लक्ष्मीची कृपा

व्हिनेगारने साफसफाई करा

किचनमधून कागद बाहेर काढल्यावर किचनचा सर्व भाग, गॅसचा वोटा साफ करा. यानंतर स्वच्छ कपड्याला व्हिनेगारमध्ये भिजवा आणि पुन्हा एकदा साफसफाई करा. यामुळे किचनच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात लपलेले झुरळ पळून जातील. 

कडुलिंब आणि नारळाचं तेल

कडुलिंबाच्या पानांची पावडर करून नारळाच्या तेलाच्या मदतीने छोट्या-छोट्या गोळ्या करा. यानंतर या गोळ्यांना किचनमध्ये वेगवेगळ्या जागेवर ठेवा. कडुलिंबात किटकनाशक गुण असतात. याच्या सुंगधामुळे किचनमध्ये असलेले झुरळ पळून जातात. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: महिलांनो! 4500 खात्यात जमा झाले नाहीत; टेन्शन घेऊच नका, फक्त 'हे' काम लगेच करा

लवंग आणि मीठ

अर्धा वाटी मीठ घ्या आणि त्यामध्ये नारळाच्या तेलाचा स्प्रे मारा. मिठात खूप जास्त तेल टाकू नका. त्यानंतर 8-10 लवंग घेऊन मिठात सरळ उभे करा. किचनमध्ये ज्या ठिकाणी सर्वात जास्त झुरळ लपून बसले आहेत, तिथे ही मिठाची वाटी ठेवा. त्यामुळे किचनमध्ये सुगंध निर्माण होईलच पण झुरळ किचनमधून लगेच पळून जातील.

ADVERTISEMENT

केरोसिन तेल

किचनमध्ये तुम्ही केरोसिन तेलाचा स्प्रे मारू शकता. पण कमी प्रमाणात या तेलाचा वापर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गॅसच्या जवळ केरोसिन ऑईल मारू नका. करोसिन ऑईलच्या वासामुळे झुरळ पळून जाऊ शकतात. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT