Navratri 2024: यंदा नवरात्रीत 'हे' आहेत 9 रंग, पहिल्या दिवशी तर...
Navratri 9 Colors Astrology : अनेक लोक आपल्या घरातील दरवाज्यावर, मंदिरात किंवा कारमध्ये 9 रंगाचे कागद किंवा कपड्यांची पताका टांगतात. हे फक्त सौंदर्य, आकर्षण वाढवण्यासाठी किंवा फॅशनसाठी नसतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवरात्री उत्सवात नऊ दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे?
नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व जाणून घ्या एका क्लिक वर
...तरच नवरात्रीत माता लक्ष्मी प्रसन्न होईल?
Navratri 9 Colors Astrology : अनेक लोक आपल्या घरातील दरवाज्यावर, मंदिरात किंवा कारमध्ये 9 रंगाचे कागद किंवा कपड्यांची पताका टांगतात. हे फक्त सौंदर्य, आकर्षण वाढवण्यासाठी किंवा फॅशनसाठी नसतं. हिंदू धर्मात याला धार्मिक आणि ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व आहे. नऊ दिवस सुरु राहणाऱ्या नवरात्री उत्सवात दुर्गा मातेची विविध रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या दिवशीही 9 दिवसात 9 रंगाचे कपडे धारण करून देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालून पूजा केल्याने देवी माता प्रसन्न होते आणि याच काय महत्त्व आहे?
नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 रंग
नवरात्रीच्या दिवशी रंगांचं विशेष महत्त्व असतं. कारण हे भक्तांना देवीच्या वेगवेगळ्या रुपांना जोडतात. प्रत्येक रंग देवीच्या विशेष गुणांना दर्शवतो. प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ आणि महत्त्व असतं. या रंगांना धारण केल्यानं देवीची कृपा होते आणि जीवनात सकारात्मक उर्जा येते.
पहिला दिवस : 4 ऑक्टोबर, 2024
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेचं पहिलं रुप शैलपुत्रीची पूजा केली जाते. 3 ऑक्टोबरला गुरुवारचा दिवस असल्याने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा केल्यानं लाभ होईल. पिवळा रंग आशा आणि प्रसन्नतेचा प्रतिक आहे.
दुसरा दिवस : 4 ऑक्टोबर, 2024
4 ऑक्टोबरला देवी मातेचं दुसरं दिव्य रुप माता ब्रम्हचारिणीची पूजा हिरव्या रंगाचे कपडे घालून करा. हिरवा रंग प्रकृतीचा प्रतिक आहे. विकास, उर्वरता, शांती आणि स्थिरतेच्या भावनेला निर्माण करतो. शुक्रवारी हिरव्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केल्यानं जीवनात एक नवी सुरुवात येते.









