Vastu Tips For Kitchen: चुकूनही 'या' दिशेला बांधू नका किचन! आर्थिक संकट येईलच पण आरोग्यही बिघडेल

मुंबई तक

Kitchen Vastu Dosh : वास्तुचं आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. घर वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं नसेल, तर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसच आयुष्यात दारिद्य्रही येऊ शकतं.

ADVERTISEMENT

Vastu Tips In Marathi
Kitchen Perfect Direction In The House
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वास्तूशास्त्रानुसार किचन कोणत्या दिशेला बांघलं पाहिजे?

point

'या' दिशेला किचन बांधल्यावर आर्थिक संकटं होतील दूर

point

कोणत्या दिशेला किचन असणं शुभ मानलं जातं?

Kitchen Vastu Dosh : वास्तुचं आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. घर वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं नसेल, तर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसच आयुष्यात दारिद्य्रही येऊ शकतं. जिथे दारिद्र्य असतं, तिथे माता लक्ष्मीची कृपाही नसते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, घरात कोणत्या दिशेला किचन असलं पाहिजे? किचन बांधताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? वास्तू शास्त्रानुसार किचन कोणत्या दिशेला असलं पाहिजे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

या दिशेला ठेवा किचन सिंक

वास्तूशास्त्रानुसार, किचनचे सिंक (वॉश बेसिन) उत्तर पूर्व दिशा म्हणजेच ईशान्य दिशेला असलं पाहिजे. असं केल्यानं घरातील लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहते. तसच घरात प्रसन्न वातावरण राहतं. तर पाण्याचे पाईप, वॉश बेसिन म्हणजेच पाण्याने जोडलेला कोणताही स्त्रोत किंवा वास्तू उत्तर पूर्व दिशेला असला पाहिजे. असं केल्याने वास्तू दोष लागू शकतो.

या दिशेला ठेवा अलमारी

वास्तूशास्त्रानुसार, किचनमध्ये सामान ठेवण्यासाठी स्लॅब, अलमारी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असली पाहिजे. असं केल्याने लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते.तसच वास्तू देवताही प्रसन्न होते.

हे ही वाचा >> Chanakya Niti : प्रेमात मिळालाय धोका? चाणक्य नीतीच्या 'या' 4 गोष्टी लक्षातच ठेवा, प्रेमही वाढेल अन् नातंही टीकेल

किचनच्या प्रवेशाजवळ बांधू नका वॉशरूम

वास्तू शास्त्रानुसार किचनच्या मुख्य प्रवेशाद्वारा समोर वॉशरूम बांधू नये. असं केल्याने वास्तू दोष लागतं. तसच घरातील लोकांची आर्थिक स्थिती खराब होते. तसच घरातील लोकांमध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात.

या दिशेला ठेवा सामान

किचनमध्ये इलेक्ट्रिकल सामान म्हणजे मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखे सामान दक्षिण पूर्व दिशेला ठेवले पाहिजे. तसच भांड्याचं स्टँड किंवा अन्य वस्तू दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवली पाहिजेत. असं केल्याने वास्तू देवता प्रसन्न राहते. तसच आशीर्वादही मिळतो.

हे ही वाचा >>  Optical Illusion: काय झाडी...काय डोंगर, पण या जंगलात वाघही लपलाय, दिसला नसेल तर क्लिक करून बघा

या दिशेला किचनचं बांधकाम करा

घरात किचन नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला असलं पाहिजे. जर या दिशेला बांधणं शक्य नसेल, तर तुम्ही उत्तर-पश्चिम दिशेला किचन बांधू शकता. असं केल्याने वास्तू दोष लागत नाही. तसच आर्थिक स्थिती मजबूत होते.

टीप - किचन टीप्सची माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp