चहाची गाळणी काळीकुट्ट झाली? काही मिनिटांतच होईल पांढरीशुभ्र, फक्त फॉलो करा 'या' Kitchen Tips
Tips To Clean Tea Strainer: घरात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यापासून ते दिवसभरातील थकवा दूर करण्यासाठी अनेकांना चहा प्यायला खूप आवडतं. पण हा चहा बनवल्यानंतर गाळणीचा वापर खूप महत्त्वाचा असतो.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
चहाची गाळणी झटपट साफ करण्यासाठी 'हे' आहेत भन्नाट उपाय
...तरच चहाच्या गाळणीला चकाकी येईल
चहाची गाळणी साफ करण्यासाठी याच गोष्टी फॉलो करा
Tips To Clean Tea Strainer: घरात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यापासून ते दिवसभरातील थकवा दूर करण्यासाठी अनेकांना चहा प्यायला खूप आवडतं. पण हा चहा बनवल्यानंतर गाळणीचा वापर खूप महत्त्वाचा असतो. कारण भांड्यात जमा झालेली चहा पावडर गाळणीतून बाहेर काढावी लागते. पण दररोज चहाची पावडर गाळणीत बसल्याने ती काळीकुट्ट होते. तसच गाळणी खराबही होते. हाताने साफ करूनही ही गाळणी चकाचक होत नाही.
आता नवरात्रीचा उत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे घरातील कानाकोपऱ्यात चकाकी आणण्यासाठी महिलांचा फोकस असणार आहे. त्यामुळे सर्वात आधी जाणून घेऊयात किचनमधील खराब झालेली गाळणी पांढरीशुभ्र कशी करायची. गाळणी साफ करण्यासाठी तुम्हाला काही किचन टीप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. यामुळे चहाची गाळणी साफ तर होईलच पण तिला चकाकीही येईल. (Many people love a cup of tea, from welcoming guests to their homes to relieving the tiredness of the day. But after making the tea, the tea stainer is most important)
चहाची गाळणी साफ करण्याचा सोपा उपाय
चहाच्या गाळणीला साफ करण्यासाठी सफेद व्हिनेगारचा वापर केला जाऊ शकतो. एका वाटीत सफेद व्हिनेगार टाकून त्यामध्ये चहाची गाळणी चार तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर गाळणीला चांगल्या प्रकारे स्क्रब करून साफ पाण्याने धुवा.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Kitchen Cleaning Tips: महिलांनाे! फक्त 2 रुपयांच्या लिंबूने संपूर्ण किचन होईल स्वच्छ, 'असा' करा वापर
ब्लीच
चहाची गाळणी साफ करण्यासाठी एक कप पाण्यात 1/4 कप ब्लीच मिसळून घ्या. आता या मिश्रणात चहाची गाळणीला 20 मिनिटांपर्यंत भिजवून ठेवा. निश्चित वेळेनंतर चहाच्या गाळणीला डिशवॉशच्या मदतीने साफ करा.
लिंबूचा रस
चहाची गाळणी साफ करण्यासाठी लिंबूचा वापरही फायदेशीर ठरतो. चहाच्या गाळणीला साफ करण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी टाकू शकता किंवा लिंबू पिळून त्या गाळणीला साफ करू शकता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Cooker Safety Tips : जेवण शिजवताना 'या' गोष्टी लक्षातच ठेवा! किचनमध्ये प्रेशर कुकरचा स्फोट कधीच होणार नाही
किचन स्लॅब आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंना करा साफ
किचन स्लॅब आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंना नेहमीच तेल-मसाल्याचे डाग लागतात. काही ठिकाणी काळपट डाग लागतात आणि हे डाग लवकर साफ होत नाहीत. शेफ पंजक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक गोष्टींसाठी लिंबू खूप फायदेशीर होऊ शकतो. सर्वात आधी एक लिंबू घ्या आणि त्याचे दोन तुकडे करा. आता लिंबूच्या एका तुकड्यावर बेकिंग सोडा टाका. त्यानंतर लिंबू किचनच्या स्लॅब आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर घासा. जेणेकरून यावर लागलेले डाग झटपट साफ होतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT