Ladki Bahin Yojana Updates : तिसऱ्या हप्त्यात 4500 आले की नाही, 'असे' करा चेक
Mukhymantri Ladki Bahin Yojana Latest News : अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीयेत. त्यामुळे महिलांना प्रश्न पडलाय की बँकेत तिसरा हप्ता जमा होणार की नाही? असे असताना आम्ही आता योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही, हे कसे तपासायचे? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता आला
बँकेत पेसै आल्यास कसं तपासायचं
तुमच्या बँकेत आले पैसे
Mukhymantri Ladki Bahin Yojana Updates : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीयेत. त्यामुळे महिलांना प्रश्न पडलाय की बँकेत तिसरा हप्ता जमा होणार की नाही? असे असताना आम्ही आता योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही, हे कसे तपासायचे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme third installment deposite women account how to check read full article aditi tatkare ajit pawar eknath shinde mukhyamantri ladki bahin yojana scheme)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजेनेत जर तुम्ही अर्जात भरलेले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही, याची खात्री करून घ्या. तसेच जर बँक खाते लिंक असेल तर ऑनलाईन बँकींग अॅपद्वारे तुम्ही खात्यात पैसे आले आहेत की नाही हे चेक करू शकता. ट्रान्झॅक्शन हिस्टरीमध्ये जाऊन तुम्हाला पैसै आले आहेत की नाही, हे तपासता येणार आहे. तसेच बँकेत जाऊन देखील पैसे जमा झाले आहेत की नाही हे चेक करू शकता.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, 'ही' शेवटची संधी! तुमचे 4500 खात्यात आले का?
तुम्हाला बँकेत जाऊन देखील याबाबतची चौकशी करू शकता. बँक खात्याच पासबूक अपडेट करा, अशाप्रकारे देखील तुम्हाला पैसे आले आहेत की नाही हे तपासता येईल. सध्याच्या घडीला व्हॉट्सअॅपचा वापर वाढल्याने अनेक लोकांचे फोनमधील मेसेज वाचणे बंद झाले आहेत. या फोनमधील मेसेजवर देखील तुम्हाला पैसे पाठवल्याचा संदेश मिळू शकतो. त्यामुळे या सर्व पर्यायाद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासू शकतात.
हे वाचलं का?
तिसरा हप्ता किती महिलांना आला?
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर तिसऱ्या टप्प्यात कशाप्रकारे निधी हस्तांतरण झाले आहे, याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार 25 सप्टेंबर रोजी 34,34,388 भगिनींना 1545.47 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. आणि 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.
तसेच 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता त्यांच्या तिसरा हप्ता देण्यात आला आहे. आणि ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) देण्यात आले आहेत, असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 'या' तारखेपर्यंत 4500 खात्यात होणार जमा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT