Majhi ladki bahin yojana New Rules : रेशन कार्डवर नाव नाही, मग असा भरा अर्ज! 

मुंबई तक

Majhi ladki bahin yojana important documents : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये आणखी सुस्पष्टता आणली असून, रेशन कार्डवर नाव नसलेल्या महिलांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या नियमामध्ये बदल.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेचे नवे नियम

point

रेशन कार्डवर नाव नसलेल्या महिलांनाही भरता येणार अर्ज

point

माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन शासन निर्णय काय?

Majhi ladki bahin yojana important information in marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत योजनेसाठी अर्ज भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने योजनेसाठी काही निकष निश्चित केले आहेत. आता या निकषांमध्ये आणखी बदल करण्यात आले असून, 12 जुलै २०२४ रोजी नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे ज्या महिलांचे रेशन कार्डवर नाव नाही, अशा महिलांनाही योजनेसाठी अर्ज भरता येणार आहे. (Eligible women who do not have name on the ration card can apply for the Mukhyamantri Majhi Ladki bahin Yojana)

मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली आहे. या योजनेतंर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये, तर वर्षाला १८००० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana : रेशन कार्डवर नाव नसेल, तर कोणते कागदपत्र द्यावे लागणार?

महाराष्ट्र सरकारने अर्ज करणाऱ्या महिलांकडे उत्पन्न दाखला नसेल, तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरीही पात्र ठरवले जाणार, असे शासन निर्णयात म्हटले होते.

हेही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana Documents : 'ही' चार कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद! 

त्यात आता आणखी सुधारणा करण्यात आली आहे. ज्या महिलांचे रेशन कार्डवर नाव नाही. त्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या महिलेच्या पतीचे रेशनकार्ड उत्पन्नाचा दाखल म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp