Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF: लाडकी बहीण योजना अर्जाची शेवटची तारीख आली जवळ, हमीपत्र PDF डाऊनलोड केलं का?
Maharashtra Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra Pdf 2024: माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख जवळ आली असून त्यासाठी सर्वात आवश्यक असलेले हमीपत्र फॉर्मचा पीडीएफ जरूर डाऊनलोड करा.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली जवळ
माझी लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र आवश्यक
माझी लाडकी बहीण योजनेचं हमीपत्राची PDF करा डाऊनलोड
Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra Pdf Download: मुंबई: माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिला मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करत आहेत. आता अर्जाची शेवटची तारीख देखील जवळ आली आहे. 31 ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अशावेळी या अर्जासोबत जे हमीपत्र द्यावं लागणार आहे ते तुम्ही डाऊनलोड करणं गरजेचं आहे. ते नेमकं कसं करायचं याचबाबत आम्ही आपल्याला नेमकी माहिती देणार आहोत. (mukhyamantri majhi ladki bahin yojana application last date 31 august 2024 do you download the hamipatra pdf)
ADVERTISEMENT
माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत शिंदे सरकार हे राज्यातील महिलांना दरमहा 1500 सरकार देणार आहे. याच योजनेसाठी अर्जासोबत हमीपत्र नावाचा एक विशेष फॉर्म देखील भरून द्यावा लागणारआहे. हा फॉर्म कसा मिळवायचा, हमीपत्र पीडीएफ कसं भरायचं आणि याबाबत सविस्तरपणे जाणून घ्या.
काय आहे माझी लाडकी बहीण योजना?
महाराष्ट्रातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिंदे सरकारने 'माझी लाडकी बहीण' ही योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये एका कुटुंबातील दोन महिलांना 1500 रुपये दरमहा मिळणार आहेत. ज्या महिला किंवा त्यांचं कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांना या आर्थिक मदतीद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे
हे वाचलं का?
माझी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते पात्रता निकष?
निकष |
अट |
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न |
माझी बहीण योजनेचा लाभ हवा असल्यास अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे. ADVERTISEMENT |
आयकर स्थिती |
कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा. ADVERTISEMENT |
रोजगार स्थिती |
अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी विभागांमध्ये नियमित/कायम कर्मचारी नसावा. |
इतर आर्थिक योजना |
1500 रु. पेक्षा जास्त रक्कम देणाऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ अर्जदार महिलेला घेतलेला नसावा किंवा घेत नसावी. |
राजकीय सहभाग |
कुटुंबातील सदस्य वर्तमान किंवा माजी खासदार/आमदार नसावा. |
जमिनीची मालकी |
कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी. |
वाहनाची मालकी |
अर्जदाराच्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी (ट्रॅक्टर वगळता) नोंदणीकृत नसावी. |
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेलं हमीपत्र PDF कसं डाउनलोड करायचं?
- योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचं PDF डाउनलोड करावं लागेल.
- महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला किंवा माझी लाडकी बहीण योजनेच्या विशिष्ट पोर्टलला भेट द्या.
- फॉर्म आणि डाउनलोड यावर क्लिक करा.
- माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF लिंक शोधा.
- PDF डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा- View PDF
माझी लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र PDF कसं भरायचं?
- PDF डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला तो फॉर्म योग्यरित्या भरावे लागेल.
- वैयक्तिक माहिती - तुमचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क तपशील आणि आधार क्रमांक टाका.
- उत्पन्न घोषणा: तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नाही असे घोषित करा.
- रोजगार स्थिती - कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी विभागांमध्ये नियमित/कायम कर्मचारी नाही याची पुष्टी करा.
- योजनेतील सहभाग - तुम्ही रु. 1500 पेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही अन्य आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही हे सांगा.
- जमीन आणि वाहन मालकी - तुमच्या कुटुंबाची जमीन आणि वाहन नोंदणी स्थिती घोषित करा.
- आधार प्रमाणीकरण - आधार क्रमांक वापरून तुमची ओळख प्रमाणित करण्यास सहमती द्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT