Personal Finance: भविष्याची चिंताच राहणार नाही! 'या' 3 म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा पैसे, SIP करणारे होतील खुश
SIP Return Calculator : जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला एका लिमिटपर्यंतच रिटर्न्स मिळतील. वय वाढत जाईल. महागाईला टक्कर देण्याइतका फंड जमा झाला नाही, तर वृद्धापकाळात आर्थिक संकट येऊ शकतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कुठे गुंतवणूक केल्यावर कोट्यावधी रुपये मिळतील?

परफेक्ट SIP बाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

किती कालावधीत रक्षित बनला कोट्याधीश ?
SIP Return Calculator : जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला एका लिमिटपर्यंतच रिटर्न्स मिळतील. वय वाढत जाईल. महागाईला टक्कर देण्याइतका फंड जमा झाला नाही, तर वृद्धापकाळात आर्थिक संकट येऊ शकतं. अशातच तुम्ही थोडी रिस्क घेऊन मोठा फंड जमा करण्याचा विचार करत असाल, तर अजूनही वेळ गेलेली नाही.
35 वर्षांच्या रक्षितला कोट्यावधी रुपयांचा फंड जमा करायचा आहे, पण त्यांना वाटतंय की आता उशिर झाला आहे. परंतु, तसं नाहीय. रक्षितने अजूनही टॉप रिटर्न्स देणाऱ्या म्युच्युअल फंड्समध्ये SIP च्या माध्यमातून पैसे गुंतवले, तर त्यांना खूप फायदा होऊ शकतो. पर्सनल फायनान्सच्या या सीरिजमध्ये आम्ही तुम्हाला टॉप रिटर्न देणाऱ्या 3 म्युच्युअल फंडबाबत आणि त्यांच्या इतिहासाविषयी सांगणार आहोत.
किती कालावधीत रक्षित कोट्याधीश बनेल?
रक्षितने जर या टॉप परफॉर्मिंग म्युच्युअल फंड्समध्ये पैसे लावले आणि यावर कमीत कमी 14 टक्के रिटर्न्स मिळण्याची शक्यता असेल, तर रक्षित 20 वर्षांमध्ये 1 कोटी 17 लाख रुपयांचा फंड जमा करू शकतात. जर रक्षितने प्रत्येक महिन्याला 10000 रुपयांची एसआयपी केली आणि प्रत्येक वर्षी त्यात 5 टक्क्यांची वाढ केली. तर 14 वर्षांच्या रिटर्नच्या दरानुसार 15 वर्षात त्याला जवळपास 4.24 कोटी रुपये फंड मिळू शकतो.
हे ही वाचा >> IPL 2025: अनेकांना मराठी वाटत असलेल्या वैभव सूर्यवंशीचं PM मोदींनीही केलं तोंडभरून कौतुक!
'हे' आहेत 3 जबरदस्त म्युच्युअल फंड
1. HDFC लार्ज एन्ड मिडकॅप फंड - रेग्युलर प्लॅन
एकूण अॅसेट्स : 23,379.95 कोटी
NAV (2 मे 2025) : 318.65
1 वर्ष रिटर्न : 9.48 %
3 वर्ष रिटर्न : 19.7 %
5 वर्ष रिटर्न : 28.07 %
2. ICICI प्र्युडेंशियल लार्ज एन्ड मिडकॅप फंड
एकूण अॅसेट्स : 19,352 कोटी
NAV ( 2 मे 2025 ) : 956.02
1 वर्ष रिटर्न : 14.09 %
3 वर्ष रिटर्न : 21:45 %
5 वर्ष रिटर्न : 30. 54 %
हे ही वाचा >> पुणे हादरलं! कोंढव्यामध्ये चीड आणणारा प्रकार, 9 वर्षाच्या मुलीवर स्वच्छतागृहात अत्याचार, आरोपी...
3. SBI लॉन्ग टर्म इक्विटी फंड - रेग्युलर प्लॅन
एकूण अॅसेट्स : 27730 कोटी
NAV (2 मे 2025) : 417.37
1 वर्ष रिटर्न : 9.90 %
3 वर्ष रिटर्न : 23.99 %
5 वर्ष रिटर्न : 29.46 %
निष्कर्ष
जर तुम्हाला कमी रिस्कमध्ये चांगलं रिटर्न पाहिजे असेल, तर SIP च्या माध्यमातून या फंडमध्ये गुंतवणूक करणं योग्य निर्णय होऊ शकतो. नियमितपणे गुंतवणूक केल्याने तुमचा पैसाच वाढणार नाही, तर तुमची फायनान्शियल सेक्युरिटीही निश्चित राहील. परंतु, गुंतवणूक करण्याआधी फायनान्शियल एडवायझरचा सल्ला नक्की घ्या.
टीप - सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. गुंतवणूक करण्याआधी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.