तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल वापरता का? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Do you also use phone in toilet? This could be a serious disease, read more
Do you also use phone in toilet? This could be a serious disease, read more
social share
google news

Why Should Stop Using phone in the toilet : माणसाच्या आयुष्यात मोबाइल अत्यावश्यक गोष्ट बनला आहे. पण, याचे काही चांगले, तर काही वाईट परिणामही भोगावे लागतात. यापैकीच एक म्हणजे टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्यामुळे होणारे नुकसान. (Side effects of using phone in Toilet)

प्रत्येकाला स्वतःच्या बाथरूमच्या सवयी असतात. काही लोक शौचालयामध्ये बसून मासिके वाचतात, तर काहींना गाणी ऐकायला आवडतात. त्याच वेळी, बहुतेक लोक टॉयलेटमध्ये बसून मोबाइल वापरतात किंवा फोनवर कोणाशी तरी बोलत असतात. वेळेचा सदुपयोग असे कारण लोकांकडून दिले जाते. पण, तुम्हाला माहित आहे का की बाथरूममध्ये बसून फोन वापरणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

Sex Health Tips: महिलांसाठी नियमित सेक्स चांगलं?, ‘या’ 10 गोष्टी समजून घ्या!

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, टॉयलेटमध्ये फोन वापरणे खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे आरोग्यासंबंधी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ते जाणून घेऊया.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या धोकादायक आजाराचा वाढतो धोका

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, टॉयलेटमध्ये बसून फोन वापरल्याने मूळव्याध होण्याचा धोका वाढतो. याला पाइल्स असेही म्हणतात. मुळव्याधीची समस्या खूप वेदनादायक असते आणि काही वेळा रक्तस्रावही होतो. जेव्हा तुमच्या गुदाशय किंवा गुदद्वारातील नसांचे पुंजके सुजतात तेव्हा असे घडते.

Sex Health: दररोज सेक्स करणे चांगले आहे का?, तज्ज्ञ म्हणतात…

साधारणपणे हा गुदाशयातील नसांचा ‘व्हॅरिकोज व्हेन्स’ रोग असतो. मूळव्याध गुदाशयाच्या आत किंवा गुदद्वाराच्या बाहेर देखील होऊ शकतो.

ADVERTISEMENT

फोनमध्ये जातात नको असलेले विषाणू

कोणत्याही घरात टॉयलेट ही स्वच्छ जागा मानली जात नाही. अनेक प्रकारचे विषाणू येथे असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही टॉयलेटमध्ये बसून फोन वापरत असाल, तर टॉयलेटमध्ये असलेले बॅक्टेरिया तुमच्या फोनला चिकटू शकतात. यानंतर, फोनमधील बॅक्टेरिया तुमच्या शरीरात प्रवेश करणे खूप सोपे होते. ज्यामुळे तुम्हाला कोणताही आजार सहज होऊ शकतो.

ADVERTISEMENT

सवय कशी सुधारायची?

टॉयलेटला जाताना तुम्ही तुमचा मोबाईल सोबत घेऊ जाऊ नका, हे महत्त्वाचे आहे. यामुळे मुळव्याध होण्याचा धोका तर कमी होतोच शिवाय बॅक्टेरिया वाढण्याचा धोकाही कमी होतो. जर तुमच्या घरात वेस्टर्न पद्धतीचे टॉयलेट असेल तर सीटवर बसताना पायाखाली स्टूल ठेवून बसावे. यामुळे तुमची बसण्याची स्थिती सुधारेल ज्यामुळे मल पास करणे सोपे होईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT