Horoscope In Marathi : काय सांगता! सिंगल लोकांच्या जीवनात होणार खास व्यक्तीची एन्ट्री, पण 'त्या' राशींसाठी खतरा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Today Rashi Bhavishya
22 September 2024 Astrology
social share
google news

बातम्या हायलाइट

point

या राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा?

point

या राशीच्या लोकांचं आरोग्य बिघडणार?

point

या राशीच्या लोकांचं लव्ह लाईफ...

21 September 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याचं आकलन केलं जातं. 22 सप्टेंबर 2024 ला रविवार आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यानं उर्जा, आत्मविश्वास आणि मान-सन्मान वाढतो. ज्योतिष गणनेनुसार, 22 सप्टेंबरचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे. तर काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनात छोट्या-मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. कोणत्या राशीच्या लोकांना 22 सप्टेंबर 2024 रोजी लाभ होणार आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

मेष राशी

आज तुम्हाला मित्राच्या सहयोगामुळं आर्थिक लाभ होईल. शैक्षणिक क्षेत्राशी जोडलेल्या लोकांवर सकारात्मक परिणाम होतील. अहंकारापासून दूर राहा. गूंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. आई-वडिलांचं सहकार्य लाभेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वृषभ राशी

आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आरोग्य चांगलं राहिल. आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. प्रवासाचा योग असेल. नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो.

ADVERTISEMENT

मिथुन राशी

ADVERTISEMENT

आजच्या दिवशी तुमचं नुकसान होऊ शकतं. विनाकारण खर्च होईल. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. कोणालाही उधार देऊ नका.

कर्क राशी 

आज तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसू शकतो. एखादं काम पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांची साथ मिळेल. घरात उत्सव साजरा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सामान्य राहील.

सिंह राशी 

आज बुद्धीच्या जोरावर पैसै कमावू शकता. मोठं संकट येणार नाही. करिअरमध्ये येणारे संकट दूर होईल. व्यापारासाठी आजचा दिवस शुभ आहे.

कन्या राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. नवीन सोर्सकडून पैसे मिळू शकतात. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

तुळा राशी 

आजच्या दिवशी तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. भविष्यासाठी पैशांची बचत करा. कार्यालयीन कामकाजात राजकारण करू नका. कामात कौशल्य दाखवण्याची संधी आहे. 

वृश्चिक राशी

आज तुमचा मान सन्मान वाढू शकतो. तुमची उर्जा वाढेल. सर्व कामं जबाबदारीने पूर्ण कराल. आर्थिक गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु नका. सिंगल लाईफच्या लोकांच्या जीवनात खास व्यक्तीची एन्ट्री होणार

धनु राशी

आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा राहील. आरोग्याबाबत सतर्क राहा. आज पार्टनरच्या भावना दुखावू नका. कोणताही निर्णय घेण्याआधी पार्टनराच सल्ला जरूर घ्या.

मकर राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. तुमच्या सुखात वाढ होईल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज कार्यालयात काम उत्साहाने पूर्ण करा.

कुंभ राशी

आजच्या दिवशी तुमच्या जीवनात प्रगती होईल. कौंटुबीक जीवनाता संपतीवरून वादविवाद होऊ शकतात. कोर्ट-कचेरीत विजय होऊ शकतो.

मीन राशी 

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी सामान्य स्वरुपाचा राहिल. वडिलांच्या सहकार्यामुळे पैसे कमावू शकता. आरोग्य उत्तम राहील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT