Uday Kotak : क्रिकेटर होण्याचं स्वप्न भंगलं, नंतर…; अशी आहे कोटक महिंद्रा बँकेच्या जन्माची गोष्ट

रोहिणी ठोंबरे

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि प्रवर्तक उदय कोटक यांनी 1 सप्टेंबर 2023 पासून व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला. गेल्या 38 वर्षांत कंपनीच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Uday Kotak Struggle Story : कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि प्रवर्तक उदय कोटक यांनी 1 सप्टेंबर 2023 पासून व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला. गेल्या 38 वर्षांत कंपनीच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच, उदय कोटक हे बिगर कार्यकारी संचालक म्हणून बँकेशी संबंधित राहणार आहेत. त्यांचा बिगर कार्यकारी संचालक म्हणून कार्यकाळ पाच वर्षांसाठी वाढवण्यात येणार आहे. उदय कोटक यांच्या नेतृत्वाखाली कोटक महिंद्रा बँकेने भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठं यश मिळवलं. गेल्या 38 वर्षात अनेक अडचणी आल्या, पण उदय कोटक यांनी आपल्या समज आणि क्षमतेच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यावर मात केली. (Uday Kotak’s dream of becoming a cricketer was shattered then how managed Kotak Mahindra Bank)

जेव्हा उदय कोटक यांचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न तुटलं…

देशातील सर्वात यशस्वी बँकर्सपैकी एक असलेल्या उदय कोटक यांना एकेकाळी क्रिकेटर बनायचं होतं. पण एका सामन्यादरम्यान चेंडू त्यांच्या डोक्याला लागला आणि त्यानंतर या दुखापतीने उदय कोटक यांच्या क्रिकेटपटू बनण्याच्या स्वप्नाला पूर्णविराम लावला.

Rohini Khadse : मुक्ताईनगरचा MVA चा उमेदवार ठरला! रोहित पवारांनी केली मोठी घोषणा

वयाच्या 20 व्या वर्षी उदय कोटक क्रिकेटच्या मैदानात डोक्याला चेंडू लागल्याने बेशुद्ध पडले. कुटुंबीय त्यांना घेऊन रूग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, दुखापत जास्त आहे, त्यामुळे तातडीने ऑपरेशन करावं लागेल. या दुखापतीमुळे त्यांना क्रिकेटच्या मैदानाला अलविदा करावं लागलं आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासालाही वर्षभरासाठी ब्रेक लागला. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी क्रिकेटर बनण्याचं स्वप्न सोडलं.

कोटक महिंद्रा बँकेची कमान घेतली हाती!

उदय कोटक यांनी सुमारे 20 वर्ष कोटक महिंद्रा बँकेचे नेतृत्व केले. 22 मार्च 2003 रोजी, कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना मिळाला. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासात बँकिंगसाठी ग्रीन सिग्नल मिळवणारी ही पहिली कंपनी होती. सध्या, कोटक महिंद्रा बँकेचे मार्केट कॅप सुमारे 3.52 लाख कोटी रुपये आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp