ड्रग्स, भारत आणि... तुम्हा-आम्हाला हादरवून टाकणारी गोष्ट!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Drugs Cases in India : देशांतर्गत ड्रग्जची प्रकरणं चिंताजनकपणे वाढत आहेत. ही एक गंभीर समस्या बनली आहे. अमली पदार्थांच्या व्यसनासाठी पंजाबचं नाव जरी खराब असलं तरी, शेजारील हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल आणि राजस्थान या राज्यांमध्येही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. देशातील इतर राज्यांमध्येही ड्रग्ज विक्रेते झपाट्याने वाढले आहेत. नुकतच पुण्यातूनही धक्कादायक प्रकरण समोर आलं. जिथे 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स मीठाच्या पाकीटातून जप्त करण्यात आले. (What are the types of drugs available in India What is their effects and punishment Interesting story)

माणसाला मरणापर्यंतचा रस्ता दाखवणारे हे ड्रग्ज असतात तरी काय?, त्याचे प्रकार आणि परिणाम काय? तसंच, या प्रकरणी एखादा व्यक्ती पकडला गेल्यास त्यासाठी शिक्षेची तरतूद काय? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

ड्रग्ज म्हणजे नेमकं काय?

ज्या पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीला गुंगी, सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्यांना मादक किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज म्हणतात. त्यामध्ये मॉर्फिन, हेरॉइन, कोकेन, मॅफेड्रॉन, ब्राऊन शुगर यासह भांग, गांजा, चरस या स्वरूपाच्या पदार्थांचा समावेश असतो. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

ड्रग्जचे प्रकार किती आणि त्याचे होणारे परिणाम काय?

ड्रग्जचे विविध प्रकार आहे. यामधील मुख्य प्रकार म्हणजे हेरॉइन, कोकेन आणि मारिजुआना. या तीन प्रकारांचा यात प्रामुख्याने समावेश होतो.

ADVERTISEMENT

हेरॉइन- हेरॉइन हे मॉर्फिनपासून तयार केलेले एक ओपिओइड औषध आहे. जे खसकस (अफू) वनस्पतीपासून मिळते. हे सामान्यत: पांढऱ्या किंवा तपकिरी रंगात पावडर स्वरूपात मिळते. याला ब्लॅक टार हेरॉइन म्हणूनही ओळखले जाते. हे आनंद, वेदना, आराम आणि विश्रांतीची भावना निर्माण करते.

ADVERTISEMENT

कोकेन- कोकेन हे एक उत्तेजक औषध आहे. जे कोका या वनस्पतीपासून मिळते. हे सामान्यत: पांढऱ्या रंगात पावडर स्वरूपात असते. क्रॅक कोकेन म्हणूनही याला ओळखलं जातं. याचे सेवन इंजेक्शन किंवा धुम्रपान स्वरूपात केले जाते. यामुळे उत्साहाची भावना, ताकद निर्माण होते. 

मारिजुआना- ज्याला भांग किंवा गांजा म्हणून देखील ओळखले जाते. हे कॅनॅबिस सॅटिवा वनस्पतीपासून बनविलेले एक औषध आहे. हे विशेषत: धूम्रपान किंवा खाद्यपदार्थांच्या स्वरूपात घेतले जाते. मारिजुआनामध्ये मन बदलणारे रसायन THC (टेट्राहाइड्रोकानाबिनॉल) असते. विश्रांती आणि भूक वाढवण्याचे हे काम करते. जास्त किंवा दीर्घकाळापर्यंत याचे सेवन केल्याने स्मृती, आकलनशक्ती आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात.

NDPS कायदा म्हणजे काय?

NDPS कायद्यांतर्गत, केंद्र सरकार प्रतिबंधित औषधांची यादी जारी करते, जी राज्य सरकारांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी अपडेट केली जाते. अंमली पदार्थ म्हणजे झोप येण्यासाठी वापरली जाणारी औषधे, जी नैसर्गिक आहेत किंवा नैसर्गिक गोष्टींपासून बनलेली आहेत. यात चरसप्रमाणेच गांजा, अफू, हेरॉईन, कोकेन, मॉर्फिन इत्यादींचा समावेश होतो.

सायकोट्रॉपिक म्हणजे मेंदूवर परिणाम करणारी औषधे, जी रसायनांवर आधारित असतात किंवा जी दोन-तीन प्रकारची रसायने मिसळून तयार केली जातात. जसे की एलएसडी, एमएमडीए, अल्प्राझोलम इत्यादी. यातील काही औषधे जीवनरक्षक आहेत, परंतु वैद्यकीय सल्ल्याशिवाय ती मोठ्या प्रमाणात घेणे धोकादायक ठरू शकते. 

Drugs प्रकरणात सापडल्यास शिक्षेची तरतूद काय?

अमली पदार्थांच्या प्रकरणात फक्त एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच कारवाई करू शकते असं नाहीये. क्रेंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या काही संस्थांनाही अमली पदार्थांच्या बाबतीत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या संस्था आणि विभागांमध्ये सीमाशुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क, CBM, BSF, CISF, RPF, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. 

NDPS कायद्यातही ड्रग्जच्या प्रमाणानुसार शिक्षेची तरतूद आहे. त्याचे तीन भाग केले आहेत. स्मॉल क्वॉंटिटी, मीडियम क्वॉंटिटी आणि कमर्शियल क्वॉंटिटी. या प्रमाणानुसार कलमे आणि शिक्षा ठरवल्या जातात. उदाहरणार्थ, स्मॉल क्वॉंटिटीत कोकेन 2 ग्रॅमपेक्षा कमी आहे, तर कमर्शियल क्वॉंटिटीत 100 ग्रॅमपेक्षा जास्त आहे. मीडियम क्वॉंटिटीत 2 ते 100 ग्रॅम दरम्यान मानले जाते. एखाद्याकडून 2 ग्रॅमपेक्षा कमी कोकेन जप्त केले तर त्याला जास्तीत जास्त 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते. परंतु 2 ग्रॅम किंवा त्याहून अधिक मिळाल्यास 10 ते 20 वर्षे शिक्षा होऊ शकते. 

स्मॉल क्वॉंटिटीत गांजा एक किलोपेक्षा कमी आहे, तर कमर्शियल क्वॉंटिटी 20 किलोपेक्षा जास्त आहे. हेरॉईनची कमी क्वॉंटिटी 5 ग्रॅमपेक्षा कमी आहे, तर कमर्शियल क्वॉंटिटी  250 ग्रॅमपेक्षा जास्त आहे. स्मॉल क्वॉंटिटीत चरस, 100 ग्रॅमपेक्षा कमी. तर कमर्शियल क्वॉंटिटी 1 किलोपेक्षा जास्त आहे. अफूची स्मॉल क्वॉंटिटी 25 ग्रॅमपेक्षा कमी आहे, तर कमर्शियल क्वॉंटिटी 2.5 किलोपेक्षा जास्त आहे. मीडियम क्वॉंटिटीत 10 वर्षांपर्यंत शिक्षा आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT