Hamas समोर मोसाद का ठरली अपयशी? हल्ल्यामागील तीन प्रमुख कारणं समजून घ्या…
इस्त्रायलचा उल्लेख जगात वेळोवेळी केला जातो. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचे कारनामे प्रख्यात आहेत. ही जगातील सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली गुप्तचर संस्था मानली जाते. मोसादकडे एवढी प्रगत हेरगिरी तंत्रे असल्याचा दावा केला जात आहे की त्यांच्यापासून कोणतीही गुप्तचर माहिती लपून राहू शकत नाही.
ADVERTISEMENT

Israel-Palestine Conflict : इस्त्रायलचा उल्लेख जगात वेळोवेळी केला जातो. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचे कारनामे प्रख्यात आहेत. ही जगातील सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली गुप्तचर संस्था मानली जाते. मोसादकडे एवढी प्रगत हेरगिरी तंत्रे असल्याचा दावा केला जात आहे की त्यांच्यापासून कोणतीही गुप्तचर माहिती लपून राहू शकत नाही. (Why did Mossad fail Infront of Hamas May Be these three reasons behind the attack on Israel)
याशिवाय इस्रायलचे सुरक्षा दल, ज्यांना इस्रायल डिफेन्स फोर्सेस म्हणून ओळखले जाते, ते ही बऱ्यापैकी शक्तिशाली आहेत. इस्रायली सुरक्षा उपक्रमाकडे जगातील सर्वात प्रगत शस्त्रे आहेत. त्यामुळे हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, इस्रायलला या हल्ल्याचा सुगावा कसा लागला नाही? इस्रायलला हे अपयश कसं आलं, त्याची कारणे काय होती? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.
भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘मविआ’ची मुसंडी, नांदेड कृषी समितीत शेकापने उधळलला गुलाल
जर तुम्ही नकाशावर नजर टाकली तर तुम्हाला इस्रायल आणि गाझा पट्टीची सीमा दिसेल. या गाझा पट्टीतून हमासच्या हल्ल्याला सुरुवात झाली. येथून क्षेपणास्त्र डागण्यात आले. त्यानंतर हमासच्या सैनिकांनी जमीन, हवाई आणि सागरी मार्गाने इस्रायलमध्ये घुसखोरी केली. हमासने यापूर्वीही गाझा पट्टीतून हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र गोळीबाराच्या घटना जवळपास रोजच घडत आहेत. हे टाळण्यासाठी इस्रायलने आयर्न डोम नावाचे संरक्षण कवच तयार केले आहे. जे क्षेपणास्त्र हल्ल्यांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखते.
याशिवाय इस्रायलने गाझा पट्टीवर नाकेबंदी केली आहे. ज्यांच्या सुरक्षेसाठी सतत गस्त असते. याठिकाणी सेन्सर आणि कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या घुसखोरीवर नजर ठेवता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, हमासचे सैनिक हे तिथलं तारेचं कुंपण तोडून इस्रायलमध्ये घुसले.