Amol Kolhe : निलेश लंकेंना खुली ऑफर; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवणार?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Amol Kolhe nilesh lanke news : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा, अशी ऑफर अमोल कोल्हेंनी निलेश लंके यांना दिली आहे.

social share
google news

Sujay Vikhe vs Nilesh lanke Ahmednagar lok sabha 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय हालचालीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. भाजपचे सुजय विखे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे, पण त्यांच्याविरुद्ध कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. यात आमदार निलेश लंके यांचे नाव आघाडीवर आहे आणि याच लंकेंना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी खुली ऑफर दिली. (अमोल कोल्हे काय बोलले... संपूर्ण भाषण बघण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा ) (Amol Kolhe offer to Nilesh Lanka to join NCP Sharad Pawar Party)

निलेश लंके हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप-शिवसेनेच्या महायुतीत सामील होण्याआधीपासूनच निलेश लंके दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत. 

विखे-पाटील यांच्याबद्दल नाराजी असलेल्या भाजपतील नेत्यांकडूनच निलेश लंके यांना ताकद दिली जात आहे. यात देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ असलेल्या नेत्यांची नावेही घेतली जात आहे. पण, महायुतीत दक्षिण अहमदनगरची जागा भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढवणार लोकसभा?

दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके हेच सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवतील, असे सांगितले जात आहे. अजित पवार महायुतीत असले, तरी निलेश लंके ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. 

त्यातच आता खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना खुली ऑफर दिली आहे. निलेश लंके हे शरद पवारांच्या पक्षात जातील आणि लोकसभा निवडणूक लढवतील, असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी लंके यांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो होता. त्यानंतर लंकेंनी आपल्या मतदारसंघात अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केले. त्यामुळे या मुद्द्याला आणखी हवा मिळाली असून, आता कोल्हेंनी ऑफर दिली आहे. त्यामुळे आता लंके आपले पत्ते कधी ओपन करणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. 

कोल्हेंनी लंकेंना काय दिली ऑफर?

अमोल कोल्हे म्हणाले, "महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं. लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षि मध्ये वाजवलीच पाहिजे", असे म्हणत कोल्हेंनी लंकेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवण्याची ऑफर दिली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT