Eknath Shinde : "माझ्या खासदारांची तिकिटं तरी कापू नका", शिंदेंची विनंती; शाह म्हणाले...
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे विद्यमान खासदारांचे मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची विनंती केली, मात्र त्यांनी ती फेटाळून लावली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ADVERTISEMENT
Amit Shah Eknath Shinde Meeting : महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 32 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा प्रयत्न आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागाच मिळू शकतात. विद्यमान 13 खासदार सोबत असल्याने शिंदे यांनी त्यांच्या जागा कायम ठेवण्याची विनंती केली. पण, शाहांनी त्यावर स्पष्ट उत्तर दिले. नेमकं काय घडलं याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. याच दौऱ्यात महायुतीच्या जागावाटपावर निर्णायक बैठक झाली. अमित शाहांनी आधी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतली. त्यानंतर शिंदे आणि फडणवीसांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या.
अमित शाहांच्या मध्यरात्रीपर्यंत बैठका
अमित शाह त्यांचा विदर्भ-मराठवाड्यातील दौरा आटोपून मंगळवारी मुंबईला आले. त्यानंतर रात्री उशिरा अमित शाह, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार याच्यांमध्ये दीड तास बैठक झाली. त्यानंतर फडणवीस आणि अजित पवार निघून गेले.
पुढचे 45 मिनिट शिंदे, मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि अमित शाहांमध्ये बैठक झाली. यामध्ये मुंबईच्या जागांवर चर्चा झाली. या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघून फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे.