Sudhir Salvi Shivadi : मला तुमच्याशी बोलायचंय... ठाकरेंचा बडा नेता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

मुंबई तक

शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी की सुधीर साळवी असा सवाल 'मातोश्री'समोर होता. मात्र आता अजय चौधरींच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

ADVERTISEMENT

सुधीर साळवी काय निर्णय घेणार?
सुधीर साळवी काय निर्णय घेणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरींना उमेदवारी

point

सुधीर साळवी यांना उमेदवारी नाही

point

सुधीर साळवींचे समर्थक नाराज

Mumbai Shivadi Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा होतेय, ती जागावाटपाची. आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपासाठी कित्येक दिवसांपासून जागा वाटपासाठी बैठकांचा सपाटा सुरू होता. अखेर काही जागा वगळता बहुतांश जागांचा विषय मार्गी लागला आहे. महायुतीमध्ये आतापर्यंत भाजपने 99, अजित पवार यांनी 44 तर एकनाथ शिंदे यांनी 99 यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. तर तिकडे महाविकास आघाडीतही शरद पवार यांन 46, उद्धव ठाकरे 65, काँग्रेसने 48 जागांची यादी जाहीर केली. मात्र अद्यापही काही जागा या निकाली निघालेल्या नाहीत. तसंच अनेक ठिकाणी एकाच पक्षातून दोन इच्छूक असल्यानं तिकीट कुणाला द्यायचं यावरुन पक्षासमोर सुद्धा पेच निर्माण झाला आहे. मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे पक्षाकडून तिकीट घेण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे या मतदारसंघात बाजी कोण मारणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून होतं. अजय चौधरी की सुधीर साळवी असा सवाल मातोश्रीसमोर होता. मात्र आता अजय चौधरींच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.  ( Ajay Chaudhari gets candidature from Shiv Sena Uddhav Thackeray)


विद्यमान आमदार अजय चौधरी की सुधीर साळवी? हा याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. पक्षाने आपल्या 65 उमेदवारांची यादी जाहीर केली खरी. मात्र उरलेल्या जागांचा प्रश्न अजूनही सुटलेला दिसत नाही. मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातही दोन इच्छूक असल्यानं हा मुद्दा निकाली निघत नव्हता. लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हे या मतदार संघात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. तर विद्यमान आमदार अजय चौधरीही आपला दाव्यावर कायम होते. त्यामुळे या मतदारसंघावरुन मातोश्रीवर गेल्या अनेक दिवसांपासून बैठका सुरू होत्या. मध्यंतरी दोन्ही इच्छूक उमेदवारांनी माघार घेण्याचा प्रस्ताव धुडकावला अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे या जागेचा तिढा अद्याप कायम होता. मात्र अखेर काल यावर निर्णय झाला आणि अजय चौधरी यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यानंतर सुधीर साळवी यांनी आता आपल्याला शिवसैनिकांशी संवाद साधायचाय असं म्हटलंय. त्यामुळे ते काय निर्णय घेतात ते पाहावं लागणार आहे.

 

Sudhir Salvi
Sudhir salvi

सुधीर साळवींनी बंड केल्यास ठाकरेंसाठी शिवडी कठीण?

 

हे ही वाचा >>Ajit Pawar Candidate List : अजित पवार यांची दुसरी यादी एका क्लिकवर वाचा, किती उमेदवार आयात केलेत?

 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अजय चौधरी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबल्यानं त्यांच्या निष्ठेमुळे मातोश्रीवर त्यांना महत्वाचं स्थान आहे. मात्र दुसरीकडे गेल्या काही दिवसांत सुधीर साळवी यांचं राजकीय वजन चांगलंच वाढलंय. सुधीर साळवी गेल्या तीन दशकांपासून या मतदारसंघात शिवसेनेचा गड कायम राखण्यासाठी धडपडणारे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. तसंच राज्यासह देशभरात प्रसिद्धी असलेल्या 'लालबागचा राजा मतदारसंघाचे ते मानद सचिव आहेत. त्यामुळे मुकेश अंबानी यांच्यासारखे बडे उद्योगपती, सर्वपक्षीय राजकीय मंडळी, सिने जगतातील कलाकार यांच्यासह अनेक मोठ्या हस्तींसोबत थेट संबंध आहेत. तसंच या मतदारसंघातील बहुतांश शाखाप्रमुखही सुधीर साळवी यांच्या बाजून उभे होते. त्यामुळे सुधीर साळवी यांना उमेदवारी मिळावी अशी अनेकांची मागणी होती. मात्र आता त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांचे समर्थक नाराज झालेत.

शिवडी मतदारसंघाची सध्याची स्थिती काय?

हे ही वाचा >>Maharashtra Assembly Election 2024 LIVE : झिशान सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

 

हे वाचलं का?

    follow whatsapp