Mahayuti : भाजपसमोर मोठा 'पेच'! एकनाथ शिंदे-अजित पवार करणार का 'त्याग'?
Mahayuti Vidhan Sabha Seat Sharing Updates : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 100 जागा मागितल्या आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 80-90 जागा मागितल्या आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महायुती विधानसभा जागावाटप
राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या 80-90 जागा
शिंदेंच्या शिवसेनेकडून 100 जागांची मागणी
Maharashtra Assembly Election 2024, Mahayuti Seat Sharing : लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीमध्ये प्रचंड चढाओढ झाली. अनेक मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर उमेदवार जाहीर करण्यात आले. याचा फटका काही ठिकाणी बसला. त्याचबरोबर अनेक जागांचा त्यागही करावा लागला. त्यामुळे महायुतीतील दोन मित्रपक्षांनी आतापासूनच भाजपवर दबाव निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांनी जागांची मागणी जाहीरपणे बोलून दाखवली असून, भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात कोण त्याग करणार हा मुद्दा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीला लोकसभेत मोठा फटका बसला. याला एक कारण उशिरापर्यंत चाललेले जागावाटप हेही असल्याचे महायुतीतीलच नेते आता सांगत आहेत. त्यामुळेच आता नेत्यांनी जागावाटपावर जोर दिला. महत्त्वाचं म्हणजे महायुतीतील दोन मित्रपक्षांनी जागांचा आकडाही जाहीर केला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हव्यात 90 जागा
राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन झाला. त्यात छगन भुजबळ यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला 90 जागा मिळायला हव्यात अशी मागणी केली. त्यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला 80-90 जागा मिळाव्यात असे म्हटले.
हे वाचलं का?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हव्या 100 जागा
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही त्यांची मागणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच यावर बोट ठेवले आणि भाजपकडून शिवसेनेला 100 जागा मागून घ्या. 90 आमदार निवडून आणू, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा >> "शिंदे साहेब, मोदी-शाहांना सांगा", कदमांनी भाजपवरच फोडले खापर
विधानसभेच्या 288 जागा, कोण करणार त्याग?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक म्हणजे 105 जागा जिंकल्या होत्या. सध्या भाजपचे 103 आमदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 39 आमदार आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 38 आमदार आहेत.
ADVERTISEMENT
कुणाचे किती खासदार?
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 4 पैकी 1 जागा जिंकली. तर शिंदेंच्या शिवसेनेने 15 पैकी 7 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 28 जागा लढवल्या होत्या. 9 जागा जिंकण्यात भाजपला यश आले आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे-अजित पवारांच्या पक्षाचे दबाव तंत्र
लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना अनेक जागा सोडाव्या लागल्या. त्यामुळे विधानसभेला तीच परिस्थिती ओढवू नये म्हणून दोन्ही पक्षानी आतापासूनच दबाव टाकायला सुरूवात केली आहे.
भाजपसमोर मोठा पेच?
महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष आहेत. तर रासप, आयपीआय आठवले गटासह इतर छोटेही पक्षही आहेत. त्यामुळे 288 जागांचे वाटप करण्याची कसरत भाजपला करावी लागणार आहे.
हेही वाचा >> BJP च्या कोअर कमिटी मीटिंगमध्ये मातोश्रीच्या 'त्या' बैठकीचा विषय, दानवेंनी दिली मोठी बातमी
लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा त्याग केला होता. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे काही मतदारसंघही भाजपने स्वतःकडे घेतले. त्यामुळे आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे विधानसभेला त्याग करणार का? यावर बरंच जागावाटपाचं गणित अवलंबून असणार आहे.
एकनाथ शिंदेंना जितक्या जागा दिल्या जातील, तितक्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाही मिळाव्यात. लोकसभा निवडणुकीत कुणी किती जागा जिंकल्या, यावर जागावाटप होऊ नये, असे छगन भुजबळ म्हणालेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाची मनधरणी करण्याचे आव्हानही भाजपसमोर असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT