Mumbai north west lok sabha : निवडणूक आयोग निकाल बदलू शकतो- माजी निवडणूक अधिकारी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

election commission can change decision mumbai north west lok sabha election former electoral officer mohammad amin
आमचे अधिकारी चुकीच्या पद्धतीत गुंतले होते हे सिद्ध झाले पाहिजे.
social share
google news

Ravindra Waiker News : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील लोकसभेचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waiker)  यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.कारण ठाकरे गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर आता रविंद्र वायकर यांच्या मेहुण्याने मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर आता रविंद्र वायकर यांची खासदारकी जाणार की राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यात आता माजी निवडणूक अधिकारी  मोहम्मद अमीन यांनी निवडणूक आयोग निकाल बदलू शकतो, असे विधान केले आहे. या विधानाने खळबळ माजली आहे. (election commission can change decision mumbai north west lok sabha election former electoral officer mohammad amin)

ADVERTISEMENT

 माजी निवडणूक अधिकारी  मोहम्मद अमीन हे आजतकच्या चर्चासत्रात सामील झाले होते. या चर्चासत्रात बोलत असताना अमीन यांनी निकालावर मोठं विधान केले आहे. ''जर आमचे अधिकारी चुकीच्या पद्धतीत गुंतले होते हे सिद्ध झाले पाहिजे, त्यानंतर निवडणूक आयोग त्याचा आधार घेईल, अंतिम अहवाल आल्यानंतर निवडणूक आयोग त्याची दखल घेईल आणि योग्य ती कारवाई करेल'', असे अमीन यांनी सांगितले. इतकचं नाही तर निकालही रद्द केला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाला तितका अधिकार असतो, असे अमीन यांनी म्हटले आहे. अमीन यांच्या विधानाने खळबळ माजली आहे. 

हे ही वाचा : "...तर मी राजकारणच सोडेन", पंकजा मुंडेंच्या अश्रूंचा फुटला बांध

प्रकरण काय? 

 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर विजयी झाले होते. त्यांनी अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव केला होता. यानंतर अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला होता. आणि निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर  या प्रकरणात आता वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल वापरत असल्याचे आढळून आले आहे.

हे वाचलं का?

मतमोजणीवर पोलिसांनी काय सांगितले? 

वनराई पोलिसांनी यासंदर्भात सांगितले आहे की, पंडीलकरकडे जो मोबाईल सापडला आहे. तो दिनेश गुरव यानेच त्याला दिला होता. हा मोबाईल ४ जून रोजी नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी वापरला गेला.

पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपी मंगेश पंडीलकर आणि दिनेश गुरव यांना सीआरपीसी 41 (अ) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर यांनी सांगितले की, पंडीलकरचा मोबाईल ४ जून रोजी जप्त केला होता. तसेच त्यातील माहिती जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : वायकरांच्या मेहुण्याकडे खरंच ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल होता का?

पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता, हे अहवालानंतर स्पष्ट होईल. एन्ट्री पॉईंट्स, स्ट्राँग रुम आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. ते मिळाल्यानंतर तपासाला गती मिळेल. पंडीलकर आणि गुरव यांना चौकशीसाठी बोलवू. गजर पडल्यास अटक वॉरंट जारी करू, असेही पोलिसांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT