Sharad Pawar Baramati : रूमाल काढून डोळे पुसले, शरद पवारांकडून अजितदादांची मिमिक्री

मुंबई तक

येणाऱ्या निवडणुकीत भावनाप्रदान होऊ नका असं म्हणताना शरद पवार यांनी थेट अजित पवार यांची मिमिक्री केल्याचं पाहायला मिळालं. काल झालेल्या सभेतल्या नेत्यांची भाषणं काय होती? सहानुभूती आणि भावनाप्रदान होती. त्यामुळे तुम्ही भावनाप्रदान होऊ नका असं म्हणत शरद पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांची मिमिक्री

point

शरद पवारांनी रुमाल काढून डोळे पुसले

point

बारामतीतलं भाषण गाजलं

Sharad Pawar Sabha Baramati :  शरद पवार आज बारामतीत युगेंद्र पवार यांच्यासाठी सभा घेत आहेत. यावेळी पवारांनी आपल्या पहिल्याच भाषणात थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. येणाऱ्या निवडणुकीत भावनाप्रदान होऊ नका असं म्हणताना शरद पवार यांनी थेट अजित पवार यांची मिमिक्री केल्याचं पाहायला मिळालं. काल झालेल्या सभेतल्या नेत्यांची भाषणं काय होती? सहानुभूती आणि भावनाप्रदान होती. त्यामुळे तुम्ही भावनाप्रदान होऊ नका असं म्हणत शरद पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केलं. (Sharad Pawar did Ajit Pawar Mimicry during baramati Sabhha)

माझे भाऊ माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे होते, मी कधी घर बघितलं नाही, शेती बघितलं नाही, राजकारण करत फिरलो, कारण माझ्या भावांवर माझा विश्वास होता. त्यामुळे तुम्ही काहीही भूमिका घेतली तरी माझ्याकडून अंतर निर्माण होणार नाही असंही शरद पवार पवार यावेळी म्हणालेत. पुढे बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या कालच्या सभेचाही समाचार घेतला. यावेळी काल झालेल्या सभेत नेत्यांनी काय केलं? सहानुभूती आणि भावनात्मक 
होती, पण तुम्ही काही भावनाप्रदान होऊ नका. यावेळी शरद पवार यांनी चष्मा काढला, खिशातून रुमाल काढला आणि डोळे पुसले. यावेळी उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद शरद पवार यांना मिळाला. त्यामुळे आता यानंतरच्या सभेत अजित पवार यावर काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  

 

उभ्या आयुष्यात कोर्टाची पायरी चढलो नव्हतो...

 

हे ही वाचा >>NCP Candidate List : शेवटच्या क्षणाला मोहोळचा उमेदवार बदलला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अखेरची यादी

"मी उभारलेला पक्ष माझ्याकडून काढून घेतला, आमच्यावर केस केली, केंद्र सरकारमध्ये चक्र फिरली आणि आमचा पक्ष दुसऱ्यांकडे गेला. मी आयुष्यात कधी कोर्टात गेलो नव्हतो, कोर्टाच्या समन्सवर कोर्टात हजर राहिलो नव्हतो, पण पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढलो" असं म्हणत पवारांनी आपल्या मनातील सल व्यक्त केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलाय? असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp