Uddhav Thackeray :"मोदीजी बाळासाहेब तुमच्या वर्गातले मित्र...", नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Pm Narendra Modi: मोदीजी बाळासाहेब तुमच्या वर्गातले मित्र नव्हते. बाळासाहेब हिंदूहृदयसम्राट आहेत. तुम्ही त्यांना हिंदूहृदयसम्राट बोलायला शिका. आठवण द्यायची झालं तर शिवाजी पार्कला महाविकास आघाडीची सभा झाली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचा घेतला समाचार
"अमित शहांनी बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द मोडला"
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Pm Narendra Modi: मोदीजी बाळासाहेब तुमच्या वर्गातले मित्र नव्हते. बाळासाहेब हिंदूहृदयसम्राट आहेत. तुम्ही त्यांना हिंदूहृदयसम्राट बोलायला शिका. आठवण द्यायची झालं तर शिवाजी पार्कला महाविकास आघाडीची सभा झाली. तेव्हा माझ्या समोर राहुल गांधींनी आपल्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन केलं आहे. जसं बाबासाहेबांच्या प्रेमाचं थोतांड सांगत आहात, तसंच जर तुमचं प्रेम हिंदूहृदयसम्राटांवर खरोखर असेल, तर तुमच्या अमितशेठला विचारा बाळासाहेबांच्या खोलीत त्यांनी दिलेला शब्द का मोडला? कठीण काळात ज्या शिवसेनेनं तुम्हाला पाठिंबा दिला होता, ती शिवसेना का संपवत आहात? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ते नाशिकच्या सभेत बोलत होते.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, नाशिक संपूर्ण जिंकून द्या. महाविकास आघाडीचं सरकार आणा. मी ज्यांना ज्यांना शब्द दिले आहेत, ते पाळतो की नाही ते पाहा. पहिल्या सभेची मला आठवण आहे. तेव्हा 23 जानेवारी होती. राम मंदिराचा सोहळा तिकडे सुरु होता. या निवडणुकीच्या काळात अमित शहा, नरेंद्र मोदी येतायत आणि मला आव्हान देत आहेत. अमित शहा म्हणाले उद्धव बाबू..मी म्हणालो बोलो अमित शेठ..मला विचारलं आतापर्यंत राम मंदिरात का नाही गेले? मी म्हणालो राम मंदिरात सुरु असलेली गळती थांबल्यावर मी जाईल. तुमच्या गळक्या गॅरंटीला महाराष्ट्रात थारा नाही. महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही. तर महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांची ठाकरे गॅरंटी चालते. विधानसभेशी ज्याचा संबंध नाही, असे विषय फेकायचे आणि तुम्ही सर्व गांगरून जायचं आणि त्यांना मतदान करून टाकायचं. मला वाटेल ते त्यांनी प्रश्न विचारावे, मी त्याला उत्तर देईल.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले; "मी शर्यतीत..."
पण मी प्रश्न विचारल्यावर मोदी आणि शहांनी उत्तर देणं गरजेचं आहे. राम मंदिराचा विषय तुम्ही काढला, कुणीही शंकराचार्य बरोबर नव्हते. पण त्याचवेळी मी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो. हेच ते काळाराम मंदिर ज्या मंदिरात आपल्याच हाडामासाच्या माणसांना प्रवेश बंदी होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. तुम्ही राम मंदिर, काळाराम मंदिराचा विषय काढलाय, म्हणून मी मिंध्यांपासून इथे सर्वांना विचारतो, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने जो अल्पसंख्यांक आयोग स्थापन केला, त्या आयोगामध्ये अल्पसंख्यांक म्हणून जे जे समाज येतात, त्यांचा प्रतिनिधी त्यात घ्यावा लागतो.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Sharad Pawar: शरद पवार पुन्हा भिजले! भर पावसात फुंकली तुतारी, म्हणाले; "निवडणुकीचा निकाल..."
मग जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम आहेत. तुम्ही यादी काढा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो धर्म स्वीकारला त्या बोद्ध समाजाचा एक सुद्धा प्रतिनिधी आयोगात का घेतला नाही? याचं उत्तर द्या आणि मग तुम्ही आम्हाला बाबासाहेबांच्या प्रेमाबद्दल शिकवा. काल शिवाजी पार्क अर्ध्याहून जास्त रिकामं होतं. जिथे जिथे जात आहेत, तिथे खुर्च्यांशी संवाद साधून जात आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT