Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले; "मी शर्यतीत..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis On Chief Minister Post
Devendra Fadnavis On Chief Minister Post
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

point

महायुतीला बहुमत मिळाल्यावर कोण होणार मुख्यमंत्री?

point

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीबाबत स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis On Chief Minister Post: आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळावं, यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवण्यास सुरुवात केली आहे. अशातच महाविकास आघाडी आणि महायुती पहिल्यांदाच आमनेसामने आली आहे. अशातच ज्यांना मिळेल, त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत रस्सीखेच होईल, अशी चर्चा रंगलीय. कारण महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिलीय. परंतु, या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं तर कोणत्या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मोठं विधान केलं आहे. 

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री व्हायची तुमची इच्छा नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी राज्याचं नेतृत्व करत होतो. पण महाराष्ट्रात अपयश आलं. असं असतानाही पक्षाने माझ्यावर विश्वास ठेऊन विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली. हे माझ्यासाठी पुरेसं आहे. आता मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी गौण आहे. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असणे, हे स्वाभाविक आहे. पण वस्तुस्थिती बघायची असते. आघाडी किंवा महायुतीचं राजकारण वास्तव्यावर आधारित आहे. तिथे भावनेला प्राधान्य देता येत नाही. घटक पक्षांना सोबत घेऊन जात असताना आमच्या सर्व आकांशा पूर्ण होतीलच असं नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची अशी शर्यत नाही आणि मी त्या शर्यतीत सहभागी नाही. 

हे ही वाचा >>  Sharad Pawar: शरद पवार पुन्हा भिजले! भर पावसात फुंकली तुतारी, म्हणाले; "निवडणुकीचा निकाल..."

ज्या पक्षाच्या जास्त जागा, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले, जास्त जागा, स्ट्राईक रेट असे कोणतेही निकष ठरलेले नाहीत. निवडणुकीनंतर शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्रित बसणार आहेत. भाजपच्या संसदीय समिती ज्यांना अधिकार देतील, ते या बैठकीत बसून याबाबतचा निर्णय घेतील.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : "आर. आर. आबांना दोष देणं अयोग्य, पण...", दादांच्या दाव्यावर फडणवीस सविस्तर बोलले

देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 या कालावधीत राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. परंतु, आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महायुतीला बहुमत मिळालं, तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT