Sharad Pawar: शरद पवार पुन्हा भिजले! भर पावसात फुंकली तुतारी, म्हणाले; "निवडणुकीचा निकाल..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar Speech In The Rain
Sharad Pawar Kolhapur Speech
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पावसात भिजल्यानंतर शरद पवारांनी सांगितला साताऱ्याचा किस्सा

point

पावसात भिजून शरद पवारांनी तुतारी फुंकली

point

कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या सभेत शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar Speech In The Rain : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानेही जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीत शरद पवारांनी पावसात भिजून जनतेला संबोधीत केलं. महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचार सभेत पवारांनी महायुतीवर हल्लाबोल केला. "माझा, जाहीरसभेचा आणि पावसाचा कायतरी संबंध आहे. महाराष्ट्रात अनेक वेळा मी बोलायला उभा राहिलो की, पावसाची सुरुवात होते. त्यानंतर निवडणुकीचा निकाल चांगला लागतो", असं मोठं विधान शरद पवारांनी केलं.

ADVERTISEMENT

शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधीत करताना म्हणाले, माझा, जाहीरसभेचा आणि पावसाचा कायतरी संबंध आहे. महाराष्ट्रात अनेक वेळा मी बोलायला उभा राहिलो की, पावसाची सुरुवात होते. त्यानंतर निवडणुकीचा निकाल चांगला लागतो. मला आनंद आहे की, इचलकरंजी मतदारसंघातून मदन कारंडे उभे आहेत. देशात लोकसभेची निवडणूक झाली. आता विधानसभेची निवडणूक होतेय. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा? याचा निकाल आपल्या सर्वांना घ्यायचा आहे.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : "अजित पवारांना हे कळायला वेळ लागेल...", 'बटेंगे कटेंगे'चं समर्थन, फडणवीस थेट बोलले

"ज्यांच्या हातात आपण महाराष्ट्राची सत्ता दिली. त्यांचा पाच वर्षांचा अनुभव बघितला तर आज सत्तेत बदल केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सत्तेत बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं काम तुम्हा सर्वांना करायचं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्यानं विजयी करा. भर पावसात तुम्ही सर्वजण इथे आलात आणि आम्हा लोकांची भूमिका समजून घेण्याची तयारी दाखवली. त्याबद्दल तुम्हा सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो, असंही शरद पवार म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "महाराष्ट्रात आमच्याकडून चूक...", विधानसभा निवडणुकीआधीच देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT