Devendra Fadnavis : "अजित पवारांना हे कळायला वेळ लागेल...", 'बटेंगे कटेंगे'चं समर्थन, फडणवीस थेट बोलले
अजित पवार यांनी 'कटेंगे तो बटेगें'च्या नाऱ्याला विरोध केल्यानंतर महायुतीमध्ये मतभेद असल्याचं बोललं जात होतं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अजित पवार यांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध
देवेंद्र पडणवीस पहिल्यांदाच बोलले
पंकजा मुंडे, अजितदादांबद्दल काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एएनआयला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या महायुतीच्या प्रचाराबद्दल आणि कटेंगे तो बटेंगेसारख्या नाऱ्यांबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांनी 'कटेंगे तो बटेगें'च्या नाऱ्याला विरोध केल्यानंतर महायुतीमध्ये मतभेद असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यानंतर अशोक चव्हाण आणि पंकजा मुंडे यांनीही या घोषणा चालणार नसल्याचं म्हटलं होतं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'एक हैं तो सेफ'च्या नाऱ्याला मात्र फारसा विरोध झाला नाही. या सर्व मुद्द्यांवर फडणवीसांनी आपली भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>EVM Hacking : "53 कोटी रुपये द्या, 65 जागा जिंकवून देतो...", मविआ खासदाराला फोन, ईव्हीएम हॅकींगचा दावा
योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटेंगे' घोषणा दिली. त्यावर विरोधकांनी महायुतीवर आरोप केले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला या विधानात काहीच चूक वाटत नाही असं म्हटलं. या देशाचा इतिहास पाहिलं तर लक्षात येतं की, जात, प्रांत, समुदायांमध्ये देश जेव्हा वाटला गेला तेव्हा नुकसा झालं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"अजित पवारांना हे सगळं समजयाला वेळ लागेल"
अजित पवार, पंकजा मुंडे यांच्या भूमिकेबद्दल विचारलं असतं, फडणवीस म्हणाले की, या लोकांना एक तर जनतेचं मत कळत नाहीये किंवा त्यांना या शब्दांचा अर्थ समजत नाहीये किंवा त्यांना काहीतरी वेगळं म्हणायचं होतं. अजित पवार गेली अनेक दशकं अशा लोकांसोबत राहिले आहेत, ज्यांच्यासाठी हिंदुत्वाचा विरोध करणं म्हणजे सेक्युलरीझम आहे.ते लोक खरे सेक्युलर नव्हते. त्यामुळे जनतेचं मत आणि राष्ट्रवाद समजायला त्यांना थोडा समजायला थोडा वेळ लागेल. बटेंगे तो कटेंगे हा नारा एकत्रित करण्यासाठी आहे. कारण एकत्र राहू तरच विकास होईल असं फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा >> Raj Thackeray : मनसेच्या जाहीरनाम्यात काय काय? मोफत योजनांबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?
हे वाचलं का?
अजित पवारांच्या भूमिकेचा अर्थ काय?
महायुतीचे तीन पक्ष सध्या राज्यात जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष महायुतीचा अजेंडा पुढे घेऊन जात असताना मुस्लिम आणि दलित समाजाला सोबत घेण्यासाठी अजित पवार यांच्यामाध्यमातून एक वेगळा अजेंडा चालवला जात असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्यावर सध्या त्यांच्याकडे असलेला पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे हे सिद्ध करण्याचं मोठं आवाहन आहे. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी पूर्णपणे पाळण्याचाही प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. तसंच त्यांच्या पक्षाकडे असलेल्या मुस्लिम उमेदवारांवरही त्यांना लक्ष ठेवावं लागणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. ही सगळी गणितं साध्य करण्यासाठी अजित पवार सध्या जोरदार तयारी करत असल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT