EVM Hacking : "53 कोटी रुपये द्या, 65 जागा जिंकवून देतो...", मविआ खासदाराला फोन, ईव्हीएम हॅकींगचा दावा

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मविआच्या नेत्याला फोन, राजकारणात खळबळ

point

थेट ईव्हीएम मशीन हॅक करुन देण्याचा दावा

point

तब्बल 65 जागा जिंकवून देण्याची ऑफर

Syed Shuja claims EVM Hacking : देशभरात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान अनेक वेळा EVM मशीनवर शंका घेतली गेली आहे. विरोधीपक्षांकडून अनेकदा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला गेलाय. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना एक नवा प्रकार समोर आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं तंत्रज्ञान वापरून ईव्हीएम हॅक करण्याचा दावा एका व्यक्तिने केला आहे. विधानसभेच्या तोंडावर तयारी करत असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना तसे फोन येत असल्याचं समोर आलंय.

ADVERTISEMENT

सय्यद शुजा नावाने महाराष्ट्रातील काही नेत्यांना फोन आलेत. ज्यामध्ये आम्ही ईव्हीएम हॅक करून आपल्या पक्षाला निवडणुका जिंकवून देऊ असा दावा केला जातोय.अमेरिकेच्या संरक्षण विभागात कंत्राटावर काम करत असल्यानं इथलं तंत्रज्ञान वापरुन आपण हे करु शकतो असं या दावा करणाऱ्या व्यक्तिने म्हटलं आहे. 

हे ही वाचा >> Raj Thackeray : मनसेच्या जाहीरनाम्यात काय काय? मोफत योजनांबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत.त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रत्येक पक्षाकडून प्रचाराची मोहीम सुरूच आहे. या सगळ्यातच आता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन म्हणजेच EVM पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण, व्हिसलब्लोअर असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती पुढे आली असून, ईव्हीएमबद्दल स्फोटक दावे करत या व्यक्तिने खळबळ उडवून दिली आहेत. अमेरिकेच्या संरक्षण खात्याचं तंत्रज्ञान वापरून ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणारा सय्यद शुजा महाराष्ट्रातील नेत्यांना फोन करून ईव्हीएम हॅक करून त्यांच्या पक्षाला निवडणुका जिंकवून देण्याच्या ऑफर देतोय. तसंच ही ऑफर देणारा असाही दावा करतोय की, आपण अमेरिकेच्या संरक्षण विभागात कंत्राटावर काम करतो.

हे वाचलं का?

राज्यात निवडणुकांच्या रणधुमाळी सुरू असतानाच या व्यक्तिने महाविकास आघाडीच्या एका खासदाराशी संपर्क साधल्याचं समजतंय. यानंतर या खासदाराने 'आज तक'शी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला. 'आज तक'च्या टीमने खासदाराचे स्वीय सहाय्यक म्हणून सय्यद शुजा याच्याशी संपर्क साधला. तसंच त्यांनी केलेल्या दाव्यांबद्दलही त्यांना विचारलं. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तसंच आपल्याकडे अजूनही काही मशीन्सचा अॅक्सेस असून, 53 कोटी रुपयांमध्ये आपण जवळपास 65 मतदारसंघांमध्ये मशीन हॅक करुन त्या जागा जिंकवून देऊ शकतो असा दावा केला आहे.

ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करण्याची सय्यद शुजाची ही पहिलीच वेळ नाही. 21 जानेवारी 2019 रोजी, सय्यद शुजा यांनी लंडनमध्ये इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन (IJA) द्वारे एक पत्रकार परिषद घेऊन खळबळ निर्माण केली होती. त्यांने व्हिडिओ कॉलद्वारे अनेक स्फोटक दावे केले होते. 2009 ते 2014 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये आपण काम केलं असून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वापरलेले EVM विकसित करणाऱ्या टीमचा आपण भाग होतो असंही सांगितलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT