Wadala Vidhan Sabha Election 2024: वडाळ्याची जागा डेंजर झोनमध्ये?, कालिदास कोळंबकरांचं काय होणार?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

कालिदास कोळंबकरांचं काय होणार?
कालिदास कोळंबकरांचं काय होणार?
social share
google news

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Wadala Constituency: मुंबई: लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांना मुंबईत ज्या जागा अपेक्षित होता तिथेच त्यांना अपयश आलं. मुंबई दक्षिण-मध्य येथून राहुल शेवाळे हे सहज निवडून येतील असा विश्वास शिंदे गटाच्या अनेक नेत्यांना होता. पण याच जागेवर शेवाळेंचा पराभव झाला.  या लोकसभा मतदारसंघातील वडाळा या विधानसभा मतदारसंघात राहुल शेवाळेंना म्हणावी तशी साथ दिली नाही.  (wadala vidhan sabha election 2024 analysis of result and impact bjp mahayuti mla kalidas kolambkar)

वडाळा विधानसभा या मतदारसंघावर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचं एकहाती वर्चस्व राहिलं आहे. या मतदारसंघातून ते आतापर्यंत अनेकदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. नारायण राणे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या कोळंबकरांनी राणेंसोबत अनेकदा पक्षांतर केलं. पण त्याचा परिणाम त्यांच्या मतदारसंघावर झाला नाही. वडाळा हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात चक्क शिवसेना (UBT) उमेदवाराला मताधिक्य मिळालं. त्यामुळे भाजपचा हा बालेकिल्ला आता आगामी विधानसभा निवडणुकीत धोक्यात आला आहे. याचाच अंदाज आम्ही डेटाच्या माध्यमातून वर्तविणार आहोत.

हे ही वाचा>> Vidhan Sabha Election 2024: धारावीचा पेपर सोपा, पण विधानसभेला उमेदवार कोण

मुंबई दक्षिण मध्य मतदारासंघातील शिवसेना (UBT)चे  उमेदवार अनिल देसाई  सावंत यांनी 53 हजार 384 मतांनी विजय मिळवला. तर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे यांना 3,41,754 मतं मिळाली होती. या निकालामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलंय, हे आपण समजून घेऊया.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) आणि शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत झाली. शिवसेनेने (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल शेवाळेंना तिकीट दिलं होतं. तर शिवसेना (UBT)ने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल देसाईंना उमेदवारी दिली होती. पण या मतदारसंघात अनिल देसाई यांनी मोठा विजय मिळवत राहुल शेवाळे यांना पराभूत केलं.

हे ही वाचा>> सायन-कोळीवाडा पुन्हा भाजपचा?, मविआ करणार बालेकिल्ला सर?

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात कालिदास कोळंबकर यांचा वडाळा हा मतदारसंघ येतो. याच मतदारसंघात शिवसेनेचे (UBT) उमेदवार अनिल देसाई यांना तब्बल 9,312 मतांची आघाडी मिळालेली. यामुळे विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपसाठी नक्कीच आव्हानात्मक ठरु शकतो.

ADVERTISEMENT

कालिदास कोळंबकर यांच्या वडाळा विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?

  • अनिल देसाई (शिवसेना - UBT) - 70 हजार 931  मतं मिळाली
  • राहुल शेवाळे (शिवसेना - शिंदे गट) - 61 हजार 619 मतं मिळाली

2019 विधानसभा निवडणुकीत वडाळामध्ये कोणाला किती मतं मिळालेली?

2019 विधानसभा निवडणुकीत भाजपचे कालिदास कोळंबकर यांना वडाळा विधानसभा मतदारसंघात 56 हजार 485 मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या शिवकुमार लाड यांना केवळ 25 हजार 640 मतं मिळालेली. या मतदारसंघात मनसेचे उमेदवार आनंद प्रभू हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना एकूण 15,779 मतं मिळालेली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT