व्लादिमीर पुतिन यांना निष्ठावंत येवजेनी प्रिझोझिनीने का दिला दगा? समजून घ्या
यापूर्वी जेव्हा रशियाने युक्रेनमधील डोनेस्तकवर कब्जा केला होता, तेव्हा प्रिगोझिनने वॅग्नर आर्मीला संपूर्ण श्रेय दिले आणि रशियन संरक्षण मंत्रालयावर वॅग्नरची भूमिका दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
ADVERTISEMENT

Why Wagner Group Against Russia : गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करून अमेरिका, युरोप आणि नाटो देशांना खुले आव्हान देणारे रशियाचे बलाढ्य राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर शनिवारी (24 जून) बंडाचं आव्हान उभं ठाकलं होतं. हे बंड रशियाच्या खाजगी लष्कर असलेल्या वॅग्नरने पुकारले होते, या गटाच्या सैन्याने एक शहर काबीजही केले होते आणि मॉस्कोच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे साऱ्या जगाच्या नजरा या बंडाला पुतिन कसे तोंड देणार याकडे लागलेल्या होत्या. तसेच पुतिन यांच्या अनेक दशकांच्या एककलमी सत्तेचा हा अंत आहे का? पण 24 तासांत पुतिन यांनी पुन्हा खेळ बदलला आणि जगाला संदेश दिला की जगाच्या पॉवर गेममध्ये अजूनही त्याचं स्थान अबाधित आहे. (What did the Wagner Group do in Russia?)
रशियातील खासगी आर्मी असलेल्या वॅग्नरने पुकारलेले बंड 24 तासांत शमले, पण युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासांत रशियात जे काही घडले, तो राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रशियाच्या सत्तेवरील पुतिन यांची पकड कमकुवत होत आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
खरंतर, वॅग्नर एक खासगी लष्करी गट आहे. वॅग्नर आर्मी युक्रेनमध्ये रशियन सैन्यासोबत युद्ध लढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते लष्करी आणि गुप्तचर कारवायांवरूनही वादात सापडले आहेत. वॅग्नर आर्मीवर मानवाधिकार उल्लंघनाचे आरोपही झाले आहेत.
24 तासांत रशियात काय घडलं? वॅग्नरने बंड केव्हा आणि का केले?
वॅग्नर आर्मी चीफ येवजेनी प्रिगोझिन हे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सर्वात खास होते. पण आता प्रिगोझिन आणि रशियन सैन्य यांच्यात चकमक सुरू आहे. प्रिगोझिन यांनी 23 जून रोजी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनमधील वॅगनरच्या सैन्यावर रॉकेट हल्ला करण्याचे आदेश दिल्याचा दावा त्यांनी केला होता.