2000 ची बॉडी बॅग 6800 ला! BMC कोविड सेंटर घोटाळा, ईडीच्या हाती स्फोटक माहिती
BMC Covid Centre Scam : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोविड सेंटर घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने मुंबई महापालिकेच्या कार्यालयातही कागदपत्रांची झाडाझडती घेतली. या तपासात ईडीच्या हाती खळबळजनक माहिती हाती लागली आहे. 2000 रुपयांची बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. बीएमसीच्या तत्कालीन महापौरांच्या सूचनेवरून हे कंत्राट दिले […]
ADVERTISEMENT

BMC Covid Centre Scam : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोविड सेंटर घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने मुंबई महापालिकेच्या कार्यालयातही कागदपत्रांची झाडाझडती घेतली. या तपासात ईडीच्या हाती खळबळजनक माहिती हाती लागली आहे. 2000 रुपयांची बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. बीएमसीच्या तत्कालीन महापौरांच्या सूचनेवरून हे कंत्राट दिले गेले होते.
ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, कोविडसाठी बीएमसीने खरेदी केलेली औषधे बाजारात 25 ते 30 टक्के स्वस्त होती. म्हणजे बीएमसीने कोरोनाची औषधे चढ्या किमतीत खरेदी केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे अशा पद्धतीच्या नोटिसा जारी करण्यात आल्यानंतरही महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष केले.
लाईफलाईनबद्दल ईडीला काय मिळाले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या तपासात असेही समोर आले आहे की, लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटने जम्बो कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांची नियुक्ती बीएमसीच्या बिलिंगमध्ये दर्शविलेल्या नियुक्त्यांपेक्षा 60-65% कमी होती. बिले काढण्यासाठी लाइफलाइन कंपनीकडून जम्बो कोविड सेंटरच्या संबंधित केंद्रामध्ये चुकीच्या पद्धतीने काम करत असलेल्या किंवा काम न करणाऱ्या डॉक्टरांची नावे दिली गेली.
हेही वाचा >> कोविड सेंटर घोटाळा: IAS संजीव जयस्वाल यांच्या नावे 100 कोटींची मालमत्ता?
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईडीने गुरुवारी मुंबई महानगरातील जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करताना झालेल्या नियमिततेची चौकशी करण्यासाठी मुंबई नागरी संस्थेच्या केंद्रीय खरेदी विभागातही कागदपत्रांची तपासणी केली.










