5 जण समुद्रात गेले अन्… मुंबईतील मार्वे बीचवर तीन मुले बुडाली!
मालाडच्या पूर्वेस मार्वे बीच आहे. रविवारी (16 जुलै) सकाळी 9.38 वाजता पाच मुले समुद्रात अंघोळीसाठी गेले होते.
ADVERTISEMENT
Marve Beach : मुंबईतील वांद्रे स्थित असलेल्या बॅण्डस्टॅण्ड येथे एका विवाहितेचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला 24 तासही होत नाही, तोच मालाड जवळ असलेल्या मार्वे बीचवर पाच मुले बुडाल्याची दुर्घटना घडली. मुलं बुडत असताना बीचवर लोक धावल्याने दोघांना वाचवण्यात यश आले, तर तिघे बुडाले. त्यांचा शोध सुरू आहे. (3 boys of age group 12 to 16 years were drowned at Marve beach in malad)
ADVERTISEMENT
पावसाळ्यामुळे समुद्र उधाणलेला असतानाच समुद्रकिनारी लोकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे काही दुर्घटनाही घडत आहे. बॅण्डस्टॅण्ड येथे एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्यानंतर आता 3 मुले बुडाल्याची घटना समोर आलीये.
वाचा >> Mumbai Bandstand : ‘मुलगी ओरडत राहिली, लाट आली अन्…’, फोटोच्या नादात गेला जीव
मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मालाडच्या पूर्वेस मार्वे बीच आहे. रविवारी (16 जुलै) सकाळी 9.38 वाजता पाच मुले समुद्रात अंघोळीसाठी गेले होते. किनाऱ्यापासून जवळपास अर्धा किमी आत ही मुले गेली. कृष्णा जितेंद्र हरिजन (वय 16 वर्ष), अंकुश भारत शिवरे (वय 13 वर्ष), शुभम राजकुमार जायसवाल (वय 12 वर्ष), निखिल साजिद कायमकुर (वय 13 वर्ष) आणि अजय जितेंद्र हरिजन (वय 12 वर्ष) हे मित्र समुद्रात मस्ती करत होते.
हे वाचलं का?
वाचा >> Sangram Thopte : “अजित पवारांचा होता विरोध, आता विरोधी पक्षनेता करा”, खरगेंना पत्र
दरम्यान, अंघोळ करत असतानाच ही मुले बुडायला लागली. मुलं बुडत असल्याचे किनाऱ्यावर असलेल्या काही जणांच्या निदर्शनास आले. त्यानंतर लोकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. लोक त्यांच्यापर्यंत तीन मुले बुडाली, तर दोघांना वाचवण्यात यश आले.
तीन मुले बुडाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तटरक्षक दल, नेव्ही डायव्हर्स, महापालिका अग्निशामक दलाचे जवानांना पाचारण करण्यात आले. सर्व पथकांनी तीन मुलांचा शोध सुरू केला असून, दुपारपर्यंत मुलांना शोधण्याचे काम सुरूच होते.
ADVERTISEMENT
कुणाला वाचवलं, कोण बुडालं…?
कृष्णा जितेंद्र हरिजन आणि अंकुश भारत शिवरे या दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं. तर शुभम जायसवाल, निखिल कायमकुर आणि अजय हरिजन हे तिघे बुडाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT