Mumbai politics : श्रीकांत शिंदे दारात जाऊन उद्धव ठाकरेंना देणार आव्हान!

मुंबई तक

ADVERTISEMENT

shrikant shinde, son of chief minister eknath shinde will visit shiv sena shakha in mumbai as part of shakha sampark
shrikant shinde, son of chief minister eknath shinde will visit shiv sena shakha in mumbai as part of shakha sampark
social share
google news

Mumbai politics news : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरेंनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिलं. आता ठाकरेंना शिंदेंचे सुपुत्र (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) प्रतिआव्हान देणार आहेत. शिंदेंचे सुपुत्र ‘सामना’च्या दारात जाऊन आवाज कुणाचाची डरकाळी फोडली जाणार आहे, असं सांगितलं जात आहे. यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे या संघर्षाला नवी धार येणार आहे. श्रीकांत शिंदेंच्या याच प्लॅनने मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. शिंदेंचा हा प्लॅन काय आणि त्यातून काय साधलं जाणार आहे, हेच समजून घ्या. (Shrikant Shinde latest news)

शिवसेनेतील फाटाफुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले. बंडानंतर एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीवरून परतल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात येऊन आव्हान दिलं. आता शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे थेट ‘सामना’च्या दारात येऊन ठाकरेंना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

श्रीकांत शिंदे शाखेला भेट देणार

शिवसेना विस्तारासाठी शिंदेंनी शाखासंपर्क अभियान सुरू केलंय. याच अभियानांतर्गत श्रीकांत शिंदे मुंबईतील शाखांना भेटी देत आहेत. मंगळवारी 6 जूनला शिंदे माहिममधील शाखांना भेटी देणार आहेत. सेनाभवन आणि सामना कार्यालय दोन्ही माहीम मतदारसंघात येतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

समजून घ्या >> पाच गोष्टींसाठी ठाकरे-राष्ट्रवादी एकत्र येणार? किती होणार फायदा?

शिंदेंसोबत गेलेले सदा सरवणकर हे याच मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाकरेंच्या सेनेचं मुखपत्र असलेल्या सामना कार्यालयाला लागूनच असलेल्या शाखेतही जाणार आहेत. श्रीकांत शिंदे सेनेतील फाटाफुटीनतंर पहिल्यांदाच सामना शेजारील प्रभादेवीतील सेना शाखेला भेट देणार आहेत.

नारायण राणेनंतर श्रीकांत शिंदे सामनाच्या दारात

शिवसैनिकांसाठी सेना भवन, मातोश्री आणि सामना या महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. शिंदेंनी सामनाच्या दारातल्या सेना शाखेला भेट देऊन याच प्रतिकांना आव्हान देण्याचा डाव आखल्याचं म्हटलं जातंय. श्रीकांत शिंदेंबद्दलचा प्रश्न विचारल्यावर थुंकल्यामुळे वादात सापडलेल्या संजय राऊतांनाही प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. पण श्रीकांत शिंदेंच्या या चालीमुळे मुंबईतलं राजकारण तापलंय.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपचा 2024 साठी काय आहे ‘घर वापसी’ प्लान?

नारायण राणेंनीही बंडखोरीनंतर सामना परिसरात सभा घेतली होती. त्यावेळी शिवसैनिक अरविंद भोसलेंनी राणेंचं स्टेज जाळण्याचा प्रयत्न केला होता. याच पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंच्या प्रभादेवीतील सेना शाखा भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT