अकोला: अकोला जिल्ह्यात आज दिवसभरात 324 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सायंकाळी २० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड, अकोट फैल व कवर नगर येथील प्रत्येकी तीन, जीएमसी क्वॉटर व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाभुळगाव, घुसर, सिंधी कॅम्प, सांगवी बाजार, मलकापूर, तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज सांयकाळी एकाचा मृत्यू झाला. त्यात हिवरखेड, तेल्हारा येथील रहिवासी असलेला ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १० फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील नऊ, बिहाडे हॉस्पिटल येथील सात, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथील तीन, ओझोन हॉस्पिटल येथील ११, आयकॉन हॉस्पिटल येथून सहा, युनिक हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून ११, अवघाते हॉस्पिटल येथून एक, नवजीवन हॉस्पिटल येथून सहा, बॉईज हॉस्टेल अकोला येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, सहारा हॉस्पिटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातून चार, तर होम आयसोलेशन येथील ११० जणांना असे एकूण २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
8 मार्च 2021 (कोरोना रुग्णसंख्या अपडेट)
आज (8 मार्च) दिवसभरात अकोल्यात 257 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान आज खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. रवी नगर, अकोला येथील रहिवासी असलेला ६१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास 1 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सध्या अकोल्यात 4506 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 52, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील 16, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, बिहाडे हॉस्पिटल येथील सहा, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील तीन, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, युनिक हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून पाच, अवघाते हॉस्पिटल येथून एक, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून 16, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथून दोन, नवजीवन हॉस्पिटल येथून दोन, आधार हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, बॉईज हॉस्टेल अकोला येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, तर होम आयसोलेशन येथील 29 जणांना असे एकूण 153 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
7 मार्च 2021 (कोरोना रुग्णसंख्या अपडेट)
अकोल्यात आज (7 मार्च) एका दिवसाता कोरोनाचे तब्बल 377 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, आज सायंकाळी एकाचा व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यात सांगळूद, बोरगाव मंजू येथील रहिवासी असलेला 30 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास 3 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, अकोल्यातील मोठी उमरी, बोरगाव मंजू व तेल्हारा अंबोसी ता.पातूर व सुकोडा, राधाकिसन प्लॉट, कुटासा, सुकोडा, गोरक्षण रोड, वाशिंबा व सांगळूद, शास्त्री नगर, अंत्री, भारती नगर, हाता, तरोडा शेगाव, बाळापूर, सातव चौक, हनुमान वस्ती, रणपिसे नगर, उमरी, कवर नगर, आदर्श कॉलनी, पंचशील नगर, दानोरी, वरुर जलका, जांभा बु., हिरपूर, बापोरी, रवीनगर, पारसकर शोरुम, गांधीग्राम, पंचमोरी, मिर्झापूर, शिवर, वनी रंभापूर, मलकापूर, जीएमसी, देशमुख फैल, पोळा चौक, सिव्हील लाईन, गड्डम प्लॉट व बाळापूर या भागात कोरोनाचे बरेच रुग्ण आढळून आले आहेत.
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील १०, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील १०, आयकॉन हॉस्पीटल येथील नऊ, हॉटेल रिजेन्सी येथील चार, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, युनिक हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथून सहा, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून पाच, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, असे एकूण ९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आता सद्यस्थिती
आतापर्यंत 17966 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यापैकी 390 जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या अकोल्यात 4811 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 मार्च 2021 (कोरोना रुग्णसंख्या अपडेट)
अकोल्यात लॉकडाऊन असून देखील गेल्या 24 तासात 248 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील काही तासात अकोला मनपा क्षेत्रात 149 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर उर्वरित अकोल्यात 99 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेता तेथे काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच हा लॉकडाऊन 8 मार्चपर्यंत वाढविण्यात देखील आला होता. मात्र, आज (4 मार्च) लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता आणण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अकोल्यात आतापर्यंत 16995 जणांना कोरोनची लागण झाली असून 378 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या अकोल्यात 4162 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. (248 corona patients in a day despite lockdown in akola)
अकोल्यात ५ मार्चपासून दुकानं सुरु करण्यास परवानगी
अकोल्यात उद्यापासून (5 मार्च) लॉकडाऊनमध्ये बदल करण्यात आले असून आता नवे नियम लागू केले जाणार आहेत. यावेळी लॉकडाऊनसंबंधी नियमात काही बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता अकोला जिल्ह्यात सर्व व्यवहार हे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच सूट असणार आहे. व्यापाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे लॉकडाऊनबाबतच्या आदेशात काही बदल करण्यात आले आहेत.
भारतात आता २४ तास घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस-डॉ. हर्षवर्धन
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ ही राज्य सरकारसाठी चिंताजनक ठरत आहे. अमरावती आणि अकोला या भागांमध्ये जिल्हा प्रशासनाने १ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली होती. परंतू रुग्णसंख्येत होत असलेली वाढ अजुनही कमी होत नसल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहर व जवळच्या प्रतिबंधित क्षेत्रात ८ मार्चपर्यंत लॉकडाउन वाढवला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे येथील व्यापाऱ्यांना नुकसान होत होतं. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सर्व व्यवसाय पुन्हा सुरु व्हावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार आता अकोलाच्या जिल्हाधिकऱ्यांनी लॉकडाऊनबाबतचे काही नियम शिथील केले आहेत.
लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता इतर सर्व दुकानं बंद होती. तसेच या काळात नियमांचा भंग करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. मात्र, आता या नियमात काहीसे बदल करण्यात आल्याने व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र असं असलं तरीही सर्व व्यापारी, दुकानदार आणि कर्मचारी यांच्या कोव्हिड टेस्ट या निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. ज्या दुकानदारांच्या कोव्हिड चाचण्या निगेटिव्ह असणार आहेत त्यांनाच दुकानं उघडण्याची परवानगी असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.