वाशिम : खासगी बस आणि टँकरचा भीषण अपघात, ३ ठार तर ७ जणं जखमी

बसचा चालक आणि क्लिनर तर टँकरच्या चालकाचा जागेवरच मृत्यू
वाशिम : खासगी बस आणि टँकरचा भीषण अपघात, ३ ठार तर ७ जणं जखमी

अकोला-नांदेड महामार्गावरील वाटाणे लॉनसमोर खासगी बस आणि टँकरचा भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून निघालेली खासगी बस आणि पाण्याचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तर ७ जण जखमी झाले आहेत. टँकरमधील चालकाचा जागीच मृत्यु झाला. याव्यतिरीक्त खाजगी बस मधील चालक आणि क्लीनर यांनाही जागीच प्राण गमवावे लागले आहेत.

या अपघातातील जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी वाशिम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रॅव्हल बस पुण्यावरुन यवतमाळकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.

चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भयंकर होता, की टॅंकरमधील चालक जागीच ठार झाला, तर खाजगी बस मधील चालक आणि क्लीनर यांनाही जागीच प्राण गमवावे लागले आहेत.

या अपघातातील जखमी व्यक्तींना वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in