दुर्दैवी ! खेळण्याच्या नादात उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्यामुळे 4 वर्षीय मुलीचा मृत्यू - Mumbai Tak - 4 year old girl accidentally eat rat poison in nagpur dies in hospital - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

दुर्दैवी ! खेळण्याच्या नादात उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्यामुळे 4 वर्षीय मुलीचा मृत्यू

नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बाहुलीसोबत खेळत असताना चार वर्षांच्या मुलीने चुकून उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. गुंजन सिहीरिया असं या मुलीचं नाव असून जय गुरुदेव नगरात ही घटना घडली आहे. सिहीरिया यांच्या घरात उंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यावर उपाय म्हणून गुंजनच्या आईने घरात जागोजागी […]
Updated At: Mar 01, 2023 14:37 PM

नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बाहुलीसोबत खेळत असताना चार वर्षांच्या मुलीने चुकून उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. गुंजन सिहीरिया असं या मुलीचं नाव असून जय गुरुदेव नगरात ही घटना घडली आहे.

सिहीरिया यांच्या घरात उंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यावर उपाय म्हणून गुंजनच्या आईने घरात जागोजागी उंदीर मारायचं औषध लावून ठेवलं होतं. घरात आपल्या बाहुलीसोबत खेळत असताना गुंजनची नजर त्या औषधावर पडली. हे औषध एखाद्या वडीच्या स्वरुपातलं असल्यामुळे गुंजनला ते चॉकलेट असल्याचं वाटलं, त्यामुळे तीने ते औषध खाल्लं.

धक्कादायक! शिलनाथ यात्रेत ५० भाविकांवर मधमाशांचा हल्ला, धावपळीत एकाचा दरीत कोसळून मृत्यू

हे औषध खाल्ल्यानंतर गुंजनला अस्वस्थ वाटायला लागलं आणि तिला उलटी झाली. यावेळी गुंजनच्या आईने तिची चौकशी केली असता आपण जमिनीवर ठेवलेलं औषध खाल्ल्याचं गुंजनने सांगितलं. हे ऐकताच गुंजनच्या आई-वडीलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ गुंजनला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. परंतू उपचारादरम्यान गुंजनचा अखेरीस मृत्यू झाला. हसत-खेळत वावरणाऱ्या गुंजनचा अशा पद्धतीने अंत झाल्यामुळे सध्या परिसरात शोककळा पसरली आहे.

हिंगोली : ट्रेडिंग कंपनीच्या कार्यालयात डांबून तरुणीवर अत्याचार, सहा जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 4 =

‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी!