Kalyan: आजी-नातीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू, पहाटे नेमकं काय घडलं?
GrandMother and GrandDaughter died in a sudden fire: कल्याण: कल्याण (Kalyan) पश्चिमेतील एक इमारतीला लागलेल्या आगीत आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला आज (17 जानेवारी) पहाटेच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. या आगीत घरातील 70 वर्षीय आजी (Grandmother) आणि 22 वर्षीय नातीचा (granddaughter) होरपळून दुर्दैवी मृत्यू (Death) […]
ADVERTISEMENT

GrandMother and GrandDaughter died in a sudden fire: कल्याण: कल्याण (Kalyan) पश्चिमेतील एक इमारतीला लागलेल्या आगीत आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घराला आज (17 जानेवारी) पहाटेच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. या आगीत घरातील 70 वर्षीय आजी (Grandmother) आणि 22 वर्षीय नातीचा (granddaughter) होरपळून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खातीजा हसम माइमकर (वय 79) आणि नातं इब्रा रौफ शेख (वय 22) असे मृतक महिलांची नावे आहेत. (70 year old grandmother and 22 year old granddaughter died in a terrible fire what really happened)
कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी नावाने इमारती आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर माईमकर कुटुंब राहते. काल मध्यरात्रीच्या सुमारास घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पण मात्र थंडीचे दिवस असल्याने घरातील कुटुबीयांना जाग आली नाही. त्यानंतर अचानक पहाटेच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत झाला आणि साडेतीन वाजेच्या सुमारास घराला आग लागली.
मुंबईतील प्रसिद्ध ‘अविघ्न’ पार्कवर पुन्हा ‘विघ्न’, लागली भीषण आग
या आगीने काही क्षणात भीषण रूप धारण करत संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले. घरातील संसार उपयोगी साहित्याची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच. पण घरात झोपलेल्या 70 वर्षीय आजी व त्यांची 22 वर्षीय नात आगीत गंभीर जखमी झाल्या. आग विझवून त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.