महाराष्ट्रात 7 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 120 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 120 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 61 लाख 24 हजार 278 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.66 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 6 हजार 695 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज 120 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.1 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 89 लाख 62 हजार 106 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 36 हजार 220 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 46 हजार 501 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2776 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 74 हजार 995 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 6 हजार 695 नवीन रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 63 लाख 36 हजार 220 झाली आहे.

आज राज्यातील कोविड बाधित रुग्णाचे दिनांक 26 जुलै 2021 पर्यंतचे रिकॉनसिलिएशन करण्यात आले आहे तर अमरावती जिल्ह्याची ही प्रक्रिया 31 जुलै पर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत प्रयोगशाळांनी अद्ययावत केलेल्या मागील तारखेच्या बाधित रुग्णांचा समावेश आज झाल्याने राज्यातील एकूण रुग्ण संख्येत 2231 ने वाढ झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोव्हिड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असंही महाराष्ट्र शासनाच्या आऱोग्य विभागाने म्हटलं आहे.

मुंबईत 324 नवे रूग्ण

ADVERTISEMENT

मुंबईत दिवसभरात 324 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 315 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 13 हजार 476 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. मुंबईत आज घडीला 4 हजार 529 सक्रिय रूग्ण आहेत. तर मुंबईचा डबलिंग रेट हा 1591 दिवस इतका झाला आहे. मुंबईतील रूग्ण वाढीचे प्रमाण हे 0.04 टक्के इतके आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT