महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार ९९८ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.३९ टक्के इतका आहे. तर आज राज्यात ६ हजार १९५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजवर राज्यात एकूण २० लाख ४९ हजार ४८४ कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६५ लाख ९६ हजार ३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ८८ हजार १८३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ९१ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर ४ हजार १०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात ८५ हजार १४४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
Corona टाळण्यासाठी नवरदेवाची उंटावरून वरात, बीडमधलं लग्न चर्चेत
आज नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित आठ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत. हे ८ मृत्यू ठाणे-५, अहमदनगर १, जालना १ आणि यवतमाळ १ असे आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
शहर अॅक्टिव्ह रूग्ण
मुंबई ९ हजार ४१
ठाणे ९ हजार १४२
पुणे १७ हजार ५२२
सातारा १ हजार ४४०
नाशिक २ हजार ७७९
जळगाव ३ हजार ३५७
औरंगाबाद ३ हजार २७०
अमरावती ५ हजार ५११
अकोला ४ हजार १६२
नागपूर १० हजार ६६२
अॅक्टिव्ह रूग्णांचा विचार केला तर नागपूर आणि पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
अकोल्यातील कठोर लॉकडाऊनच्या नियमात ‘हे’ बदल