कोलकात्यात अग्नीतांडव : रेल्वे इमारतीला आग, ९ जणांचा मृत्यू

मुंबई तक

कोलकात्यात सोमवारी संध्याकाळी रेल्वे इमारतीला लागलेल्या आगीत ९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये ४ अग्नीशमन दलाचे जवान, दोन रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी आणि एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही घटनास्थळावर संध्याकाळी दाखल झाल्या होत्या. Tragic news from Kolkata […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोलकात्यात सोमवारी संध्याकाळी रेल्वे इमारतीला लागलेल्या आगीत ९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये ४ अग्नीशमन दलाचे जवान, दोन रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी आणि एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही घटनास्थळावर संध्याकाळी दाखल झाल्या होत्या.

रेल्वेची ही इमारत व आतील कार्यालयं अत्यंत अरुंद जागेत असल्यामुळे अग्नीशमन दलाला आग विजवताना अडचणींचा सामना करावा लागला. ही जागा इतकी अरुंद होती की अग्नीशमन दलाला शिडी उभी करणं कठीण जात होतं. याच आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात ४ जवानांसह पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.

दरम्यान या आगीचा रेल्वेच्या बुकींग सेवेवरही परिणाम झालेला पहायला मिळाला. आग लागल्यानंतर या भागातला वीज पुरवठा तात्काळ खंडीत करण्यात आला. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल दुःख व्यक्त करुन मृतांच्या कुटुंबियांप्रती आपला शोक व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करण्यात येईल असे आदेश गोयल यांनी दिले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp