अब्दुल सत्तार, संजय राठोडांना सेफ करणाऱ्या ‘या’ शिंदे फॉर्म्युल्यानेच संजय शिरसाटांचा घात?
मंत्रिमंडळातून आऊट होणार… आऊट होणार या चर्चेनं फेर धरलेला असतानाच अब्दुल सत्तारांनी रात्रीतून चक्रं फिरवत बाजी मारली. तर दुसरीकडे संजय शिरसाट मंत्री होणार हे जवळपास निश्चित मानलं जात असताना ते मात्र क्लिनबोल्ड झाले. वादात सापडूनही सत्तार, संजय राठोडांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. हे घडलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका फॉर्म्युल्यामुळे! मंत्रिमंडळ विस्ताराचा हा फॉर्म्युला काय आणि याने […]
ADVERTISEMENT

मंत्रिमंडळातून आऊट होणार… आऊट होणार या चर्चेनं फेर धरलेला असतानाच अब्दुल सत्तारांनी रात्रीतून चक्रं फिरवत बाजी मारली. तर दुसरीकडे संजय शिरसाट मंत्री होणार हे जवळपास निश्चित मानलं जात असताना ते मात्र क्लिनबोल्ड झाले. वादात सापडूनही सत्तार, संजय राठोडांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. हे घडलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका फॉर्म्युल्यामुळे! मंत्रिमंडळ विस्ताराचा हा फॉर्म्युला काय आणि याने कोणाकोणाची विकेट काढली? अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंतांना मंत्री कसं केलं, याचा घेतलेला वेध…
एकनाथ शिंदेंनी २९ जूनला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण मंत्रिमंडळचा विस्तार होण्यासाठी तब्बल ९ ऑगस्ट उजाडावा लागला. लवकर लवकर म्हणत चाळीस दिवस लागले. हे कशामुळे झालं, तर इच्छुकांच्या अपेक्षांमुळे!
शिंदेंनी ४० आमदार फोडले पण त्यांना समाधानी कसं करणार? त्यांची अपेक्षापूर्ती हा यक्षप्रश्न एकनाथ शिंदेंसमोर होता. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिंदेंनी दोन निकषांचा एक फॉर्म्युला काढला. या फॉर्म्युल्यातूनच ९ हा आकडा समोर आला. आणि अपक्ष छोट्या पक्षांना वगळून शिंदे गटाच्या ९ शिवसेना आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
‘मित्रपक्षानेच शिवसेनेवर आघात केला’; ‘धनुष्यबाणा’बद्दल शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला
पहिला निकष होता, शिंदेंसाठी मंत्रिपदावर पाणी सोडणं. ज्यांच्याकडे ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपद होतं, त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आलं. याच निकषाने गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदिपान भुमरे, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार हे सहाजण मंत्री झाले.
पण, हा निकष लावूनही सत्तारांची विकेट जाणार आणि औरंगाबादच्याच संजय शिरसाटांना वेटिंग लिस्टवरून बढती दिली जाणार हे जवळपास निश्चित झालं होतं. त्यासाठी शिरसाट समर्थक मुंबईतही आले. मात्र दुसऱ्या निकषाने सत्तारांना बालंबाल वाचवलं.
दुसरा निकष होता, मंत्रिपदाचा अनुभव. एकनाथ शिंदेंकडे पन्नास आमदारांचं पाठबळ आहे. यामध्ये चाळीस शिवसेनेचे आहेत. संदीपान भुमरे हे सर्वाधिक पाच वेळचे आमदार आहेत, तर सहा जण चारवेळा. ११ जण तीनवेळा. सात जण दोन वेळा आणि १४ जण एक वेळा आमदार झाले आहेत. हा अनुभव बघता भुमरेंना हमखास मंत्रिपद मिळायला हवं होतं.
‘भाजपनेच शिवसेना फोडली’; सुशील कुमार मोदींचं मोठं विधान, नितीश कुमारांना गर्भित इशारा
दोन वेळा आमदार झालेल्या तानाजी सावंतांना मंत्रीपद मिळायला नको होतं, पण सर्वांत अनुभवी आणि कमी अनुभवी दोघांनाही मंत्रिपद मिळालं. दोघांना एका रांगेत आणणारा निकष आहे, मंत्रिपदाच्या अनुभवाचा.
शिंदे गटातले अनिल बाबर हे तसं बघितलं तर अनुभवाने सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत. चार वेळा आमदार असले, तरी बाबर शिंदे गटातले सर्वांत जुने म्हणजे १९९० मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. भुमरेंकडेही संसदीय राजकारणाचा एवढा अनुभव नाही. पण कट्टर शिंदे समर्थक असूनही बाबरांना मंत्रिपद मिळालं नाही. याच कारण आहे, बाबरांकडे नसलेला मंत्रिपदाचा अनुभव.
ज्यांना चार-चार, तीनतीन वेळा आमदारकीचा अनुभव आहे, त्यांची शिंदेंनी वापरलेल्या याच फॉर्म्युल्यानं विकेट घेतली. दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि फडणवीसांमुळे ज्यांना राजीनामा द्यावा लागला, त्या संजय राठोडांना मंत्रिपद मिळालं, ते केवळ याच दुसऱ्या निकषामुळे.
कारण या निकषानुसार शिंदेकडे ठाकरे सरकारमधले ६ आजी आणि तीन माजी मंत्र्यांकडेचे अनुभव होता. त्यामुळेच दोन्ही बाजूंनी ९-९ आमदारांनी शपथ घेण्याचा आकडा फायनल झाला. आणि शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला.
सत्तारांना वगळलं असतं, तर त्यामुळे शिंदे अडचणीत आले असते. कारण त्या एका जागेवर कुणालाही संधी देणं शिंदेंना महागात पडलं असतं. आणि त्यामुळे शिरसाटांनी कोट शिवलेला असूनही तो त्यांना शेवटच्या क्षणी कपाटात ठेवावा लागला. पण दुसऱ्या विस्तारावेळी शिंदेंनी मोठी डोकेदुखी होऊ शकते. त्यासाठी कोणता फॉर्म्युला शिंदे आणता ते बघायला हवं.