अभिनेत्री शर्वाणी पिल्लईची नवी इनिंग; निर्मिती क्षेत्रात करणार पदार्पण

मुंबई तक

विविध मालिका तसंच विविध नाटक, चित्रपट अशा या माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई आता तिच्या नव्या इनिंगला सुरुवात करणारे. शर्वाणी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ‘पॅलेट मोशन पिक्चर्स’ असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव असून शर्वाणी आणि लेखक, दिग्दर्शक सुश्रुत भागवत हे या निर्मिती संस्थेचे निर्माते आहेत. “वर्दे आणि सन्स” […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विविध मालिका तसंच विविध नाटक, चित्रपट अशा या माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई आता तिच्या नव्या इनिंगला सुरुवात करणारे. शर्वाणी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ‘पॅलेट मोशन पिक्चर्स’ असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव असून शर्वाणी आणि लेखक, दिग्दर्शक सुश्रुत भागवत हे या निर्मिती संस्थेचे निर्माते आहेत.

“वर्दे आणि सन्स” या आगामी लोकेश गुप्ते दिग्दर्शित वेब सीरिजची निर्मिती पॅलेट मोशन पिक्चर्स करत असून अभिजित खांडकेकर, उपेंद्र लिमये, रेशम श्रीवर्धन, दीपक करंजीकर अशी दमदार कलाकार मंडळी या वेबसीरिजच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहेत. २०१४ साली प्रदर्शित झालेला सौ. शशी देवधर हा मी आणि सुश्रुत भागवत ह्यानी एकत्र लिहिलेला पहिला सिनेमा होता.

सुश्रुत भागवत म्हणाले, मी आणि अभिनेत्री – लेखिका शर्वाणी पिल्लई आम्ही जाहिरात क्षेत्रात पॅलेट मोशन पिक्चर्स ह्या निर्मितीसंस्थेमार्फत जाहिरातींची निर्मिती केली आहे. चित्रपट निर्मिती करताना पोस्ट प्रोडक्शन ही एक अत्यंत महत्वाची जबाबदारी आम्ही आजवर पेलली आहे. चित्रपटसृष्टीत आजवर जाहीरपणे “आपलं सिंडिकेशन आहे” हे सांगितलं गेल्याची उदाहरण मोजकीच असतील, किंबहुना नसतीलही.”

“रसिक प्रेक्षकांनी आजवर जसं प्रेम आमच्यावर आमच्या कामावर केलं तसं ते ह्यापुढे सुद्धा नक्की राहील ह्या विश्वासावर आमचा हा एक छोटासा प्रयत्न, एक छोटं पाऊल, एक नवा प्रवास!” असं अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई आणि लेखक, दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी सांगितलंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp