Bollywood : आलिया, प्रियांका, कतरिनाच्या चित्रपटात शाहरुख खान, कोणत्या भूमिकेत दिसणार?
‘जी ले जरा’ या नव्या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामुळे आतापासूनच या चित्रपटातील पात्र आणि भूमिकांविषयी चर्चा रंगू लागली आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहतेही त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ADVERTISEMENT

‘जी ले जरा’ या नव्या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामुळे आतापासूनच या चित्रपटातील पात्र आणि भूमिकांविषयी चर्चा रंगू लागली आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहतेही त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. झोया अख्तर लिखित आणि फरहान अख्तर दिग्दर्शित या रोड-ट्रिप चित्रपटात आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ एकत्र दिसणार आहेत. त्याचबरोबर शाहरुख खानचीही भूमिका आहे.
चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट 2021 मध्ये सुरू होणार होते, पण आता ते यावर्षीपासून सुरू होईल. झोया अख्तर यांनी रीमा कागती यांच्यासह ‘जी ले जरा’ चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका साकरणाऱ्या तीनही अभिनेत्रींच्या तारखा जुळत नसल्यामुळे ठरवल्याप्रमाणे शूटिंग सुरू करता आले नाही. अखेर यावर्षी ते सुरू होईल.
शिंदे, फडणवीस, मी अन् 150 बैठका; सत्तांतराबद्दल तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट, महाराष्ट्रात खळबळ
कतरिना-प्रियांका-आलियासोबत शाहरूखची दमदार एन्ट्री!
फरहानच्या चित्रपटाची कास्टिंग खूपच रंजक असणार आहे. आलिया, प्रियांका आणि कतरिना यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांसाठी चांगला अनुभव असेल. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूखही अभिनेत्रींसोबत रोड ट्रिपवर दिसणार आहे. यामध्ये शाहरूख एक हटके भूमिका साकारणार आहे. मात्र याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आली नाही आहे.
“उद्धव ठाकरे, तुम्ही हिंदुत्व फक्त सोडलंच नाही, तर…”; भाजपने वाचली यादी
आधीपासूनच पठाण स्टार शाहरूखची बॉन्डिंग या तिनही अभिनेत्रींसोबत खूप चांगली आहे. आलिया भट्टने शाहरूखसोबत डियर झिंदगी, कटरीना कैफने जब तक है जान आणि झीरो तसंच प्रियांका चोप्राने डॉन असे मनोरंजक चित्रपट केले आहेत.