तिरंगा हा आपला राष्ट्रवाद आहे याचा ठाकरे सरकारला विसर पडला आहे का?-ओवेसी

एमआयएमचे संस्थापक असदुद्दीन ओवेसी यांची ठाकरे सरकारवर कडाडून टीका
तिरंगा हा आपला राष्ट्रवाद आहे याचा ठाकरे सरकारला विसर पडला आहे का?-ओवेसी

तिरंगा हा आपला राष्ट्रवाद आहे याचा शिवसेनेला आणि या सरकारला विसर पडला आहे का? आम्ही तिरंगा रॅली काढणार म्हटल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला काय झालं? एमआयएमच्या कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी अडवण्यात आलं. तिरंगा हा आपल्या देशाची आन-बान आणि शान आहे. तरीही आम्हाला तिरंगा हाती घेऊन मोर्चा काढण्यासाठी आम्हाला अडवण्यात का आलं? आम्ही मोर्चा काढणार म्हटल्यावर कलम 144 का लागू का लागू करण्यात आलं? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबईत विचारला आहे.

ठाकरे सरकारला आमचा एकच प्रश्न आहे की राहुल गांधी मुंबईत येणार आहेत तेव्हाही असंच कलम 144 लावणार का? तेव्हा ओमिक्रॉनबद्दल तुम्ही चर्चा करणार नाही. तेव्हा तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत? आम्हाला या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरेंनी द्यावीत.

तिरंगा हा आपला राष्ट्रवाद आहे याचा ठाकरे सरकारला विसर पडला आहे का?-ओवेसी
सोलापूर: ओवेसी 'त्या' कारमधून आले, वाहतूक पोलिसांनी ठोठावला 200 रुपयांचा दंड; नेमकं काय घडलं?

सेक्युलारिझम या शब्दाने मुस्लिम बांधवांचं वाटोळं केलं. प्रत्येक वेळी हा शब्द पुढे आणला जातो आणि मुस्लिम बांधवांना फसवलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून हेच सुरू आहे. आम्हाला शिकायचं नाही, आमची शिकायची इच्छा नाही हे सांगितलं जातं त्यामध्ये काहीही तथ्य नाही. आम्हाला आरक्षण द्या मग बघा कसं शिक्षणाचं प्रमाण वाढतं. आमच्यापैकी अनेकांकडे शिक्षण देण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे आम्ही आरक्षणावर अवलंबून आहोत. आमचा विचार या सरकारने विचार केलेला नाही. या सरकारला फक्त मराठा समाजाशी घेणंदेणं आहे का? आमच्या प्रश्नांचं काय? असेही सवाल आज झालेल्या भाषणात असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केले आहेत.

मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संरक्षणांच्या मागणीसाठी आज असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्त्वात मुंबईत एमआयएमने तिरंगा रॅली काढली. त्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त लावला आणि कलम 144 लावण्यात आलं. त्यावर आज ओवेसी यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली.

ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आनंदनगर टोल नाका येथे जोरदार पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. हे मोर्चे रोखण्यासाठी पोलिसांसह एसआरपीएफ च्या तुकड्या देखील तैनात केल्याने सर्व वाहनांची बॅरिकेड्स लावून कसून तपासणी करण्यात येत होती. आता ओवेसी यांनी या ठिकाणी उपस्थिती लावत आपली मागणी आणखी बुलंद केली. आम्हाला आरक्षण का हवं आहे हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in