क्रूज ड्रग्ज पार्टी : शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर शिक्षा झालीच पाहिजे – रामदास आठवले
मुंबईत रविवारचा दिवस गाजला तो अमलीपदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे. शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जात असलेल्या एका क्रूझवर NCB ने धाड टाकून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत NCB ने ७-८ जणांना ताब्यात घेतलं असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. NCB च्या या कारवाईनंतर आता राजकीय क्षेत्रातूनही […]
ADVERTISEMENT

मुंबईत रविवारचा दिवस गाजला तो अमलीपदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे. शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जात असलेल्या एका क्रूझवर NCB ने धाड टाकून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत NCB ने ७-८ जणांना ताब्यात घेतलं असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे.
NCB च्या या कारवाईनंतर आता राजकीय क्षेत्रातूनही यावर प्रतिक्रीया येण्यास सुरुवात झालेली आहे. केंद्रीय मंत्री आणि RPI चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी, शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही या प्रकरणात सहभागींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं वक्तव्य केलंय.
“फिल्म इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात ड्रग्जची लागण झाली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ही बाब समोर आली. फिल्म सिटीत ड्रग्जचं जाळं पसरलं आहे. ड्रग्जमुक्त महाराष्ट्र आणि मुंबईसाठी राज्य सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रीया आठवले यांनी दिली. ते डोंबिवलीत बोलत होते.
क्रूज ड्रग्स पार्टी: Shah Rukh चा मुलगा Aryan ची चौकशी सुरूच, पाहा काय दिला जबाब
दरम्यान NCB अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत जहाजावर कोकेन, चरस आणि एमडीएमए यासह विविध अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आल्यामुळे दिवसभर प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरु आहे.
Rave Party : आर्यन खानसह रेव्ह पार्टीतील आठ जणांची नावं आली समोर; NCB ने दिली माहिती
काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या कॉर्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस जहाजावर रेव्ह पार्टी होणार असल्याची गोपनीय माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकत तीन चालणाऱ्या रेव्ह पार्टीचा डाव पहिल्याच दिवशी उधळून लावला.