बीड : भाजप जिल्हाध्यक्षाच्या जागेवर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारत धडक कारवाई केली आहे. सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मध्यरात्री मारलेल्या या छाप्यात पोलिसांनी ४८ जुगाऱ्यांना अटक केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह अलिशान कार, मोबाईल असा ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल केला असून तीन फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान राजेंद्र मस्के यांनी पोलीस कारवाईदरम्यान आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मस्के यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला जुगार अड्ड्याशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं. ज्या जागेवर पोलिसांनी कारवाई केली ती जागा माझ्या मालकीची नाही. ती जागा माझा भाऊ मदन मस्के याची आहे. सत्ताधाऱ्यांमार्फत या प्रकरणात मला गोवलं जात आहे. पोलिसांनी यात कसलीही चौकशी न करता माध्यावर गुन्हा दाखल केला आहे. याविरुद्ध आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं मस्के यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT