बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारचं हम साथ-साथ है: चित्रा वाघ
पुणे: पुणे: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज (25 फेब्रुवारी) पुण्यात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच वानवडी पोलीस स्थानकात जाऊन घटनेविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ या अत्यंत संतापलेल्या दिसून आल्या. ‘बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारचं हम साथ-साथ है.’ असा गंभीर आरोप यावेळी चित्रा वाघ यांनी केला. पूजा […]
ADVERTISEMENT

पुणे: पुणे: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज (25 फेब्रुवारी) पुण्यात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच वानवडी पोलीस स्थानकात जाऊन घटनेविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ या अत्यंत संतापलेल्या दिसून आल्या. ‘बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारचं हम साथ-साथ है.’ असा गंभीर आरोप यावेळी चित्रा वाघ यांनी केला.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी चित्रा वाघ यांनी केली आहे.
चित्रा वाघ यांनी संजय राठोडांवर केला हल्लाबोल, पाहा ही पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेआधी पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं?