गरिबांचा विचार न करता केलेल्या लॉकडाउनला आमचा विरोध – चंद्रकांत पाटील

मुंबई तक

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेत लॉकडाउन लावणार असल्याचं संकेत दिले. वाढणारी रुग्णसंख्या पाहता लॉकडाउन लावणं हाच एक पर्याय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. परंतू सरकारच्या या संभाव्य लॉकडाउनला भाजपने विरोध करायला सुरुवात केली आहे. …तर लॉकडाउन करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं – खासदार उदयनराजे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेत लॉकडाउन लावणार असल्याचं संकेत दिले. वाढणारी रुग्णसंख्या पाहता लॉकडाउन लावणं हाच एक पर्याय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. परंतू सरकारच्या या संभाव्य लॉकडाउनला भाजपने विरोध करायला सुरुवात केली आहे.

…तर लॉकडाउन करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं – खासदार उदयनराजे

गरिबांचा विचार न करता केलेल्या लॉकडाउनला आमचा विरोध असेल असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. “लॉकडाउनचा निर्णय जाहीर करण्याआधी त्यांनी राज्यातील गरीब व्यक्तींसाठी एक पॅकेज दिलं पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांचा विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय सरकारने घेऊ नये. कोरोनावर नियंत्रण आणताना सरकारने गरीबांच्या पोटोचाही विचार करायला हवा. सरकार गोरगरीब नागरिकांचा विचार न करता लॉकडाउन लावणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे.”

हवेच्या वेगाप्रमाणे कोरोनाचा प्रसार होतोय, राजेश टोपेंनी व्यक्त केली ही भीती

यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी, गेल्या वर्षभरापासून राज्यातले दुकानदार आणि व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. वर्षभर कडक लॉकडाउनंतर आता आपल्याला समतोल साधता आला पाहिजे. ३० दिवसांपैकी १५ दिवस दुकानं सुरु राहतील का याचा सरकारने विचार करावा. सरकारने गेल्या वर्षभरात नागरिकांना एक रुपयाचंही पॅकेज दिलं नाही. गरिबांची सध्याची अवस्था काय होते आहे हे देखील सरकारने पहायला हवं असं म्हटलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही संपूर्ण लॉकडाउनला विरोध केला.

राज्यातील रुग्णालयांमध्ये बेड्स कसे उपलब्ध होतील, रेमिडेविसीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड कसे उपलब्ध होतील याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं असं फडणवीस म्हणाले. लॉकडाउनचा निर्णय घेताना सरकारने लोकांच्या मनात असलेला रागही विचारात घ्यावा असं फडणवीस म्हणाले. यावेळी बोलत असताना फडणवीसांनी लसीच्या पुरवठ्यापासून सत्ताधारी पक्षातील मंत्री केंद्र सरकारवर करत असलेल्या आरोपांचा मुद्दा काढला. आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत…पण केंद्राकडे बोट दाखवलं तर मग आम्हालाही उत्तर द्यावं लागेल असं फडणवीस म्हणाले.

पुणे : महाराष्ट्राला लसीची कमतरता भासणार नाही – प्रकाश जावडेकरांचं आश्वासन

वीजबीलांवरुन आजही लोकांच्या मनात रोष आहे. मागचं वर्ष लॉकडाउनमुळे संपूर्ण खराब केलं पण तरीही लोकांना लाईटची बिलं आली. लोकांनी जगायचं तरी कसं? राज्यावर कर्जाचा बोझा वाढतोय…वाढू द्या. व्यापारी संपत जात चालला आहे…संपू द्या अशी भूमिका घेऊन कसं चालेल. कोणताही विचार न करता लॉकडाउनचा निर्णय घेतला तर लोकांचा राग अनावर होईल असाही इशारा फडणवीस यांनी बैठकीत दिला. त्यामुळे राज्य सरकार आता लॉकडाउनसंदर्भात काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp