चंदीगढ महापालिकेत 'आप'ची जोरदार मुसंडी! भाजपला धक्का, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर

Chandigarh Municipal Corporation Election Result : चंदीगढ महापालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले, पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या 'आप'ने सर्वाधिक जागा जिंकल्या
चंदीगढ महापालिकेत 'आप'ची जोरदार मुसंडी! भाजपला धक्का, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर
प्रातिनिधीक छायाचित्रपीटीआय

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना आज चंदीगड महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालाने भाजप, काँग्रेस शिरोमणी अकालीला दलाला जोरदार धक्का दिला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या अकाली दलाला एकही जागा जिंकता आली नाही, तर पहिल्यांदाच या महापालिका निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे.

चंदीगढ महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. 35 जागांसाठी निवडणूक झाली. चंदीगढ महापालिका निवडणुकीत आपने पहिल्यांदाच उडी घेतली होती. तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप वेगवेगळे लढले. काँग्रेसच्या कामगिरीकडेही सगळ्यांचं लक्ष होतं.

मतमोजणी सुरू झाल्यापासून आपने आघाडी घेण्यास सुरुवात केली. महापालिका निवडणुकीत आपने भाजप-काँग्रेसला टक्कर देत मोठी मुसंडी मारली आहे. पहिल्याच प्रयत्ना आपने 35 पैकी तब्बल 14 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 12 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसचे 8 उमेदवार विजयी झाले असून, अकाली दलाला 1 जागेवर विजय मिळाला आहे.

मतांच्या टक्केवारीत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर

मतांच्या टक्केवारीकडे लक्ष दिल्यास सर्वाधिक मतं काँग्रेसला मिळाली आहेत. काँग्रेसला 29.98 टक्के मतं मिळाली आहेत. तर भाजपला 28.96 टक्के मतं मिळाली आहेत. 14 जागा जिंकणाऱ्या आपला 27.26 मतं मिळाली आहेत. 2016 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला 4 जागा मिळाल्या होत्या. त्यात दुप्पट झाल्या आहेत. 2016 मध्ये महापालिकेत 26 नगरसेवकच होते.

पंजाबमध्ये बदल करण्यासाठी तयार -अरविंद केजरीवाल

चंदीगड महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत पक्ष कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. 'चंदीगढ महापालिकेत आम आदमी पक्षाचा हा विजय पंजाबमध्ये आगामी काळात होणाऱ्या बदलांचे संकेत आहेत. चंदीगढच्या लोकांनी आज भ्रष्ट राजकारणाला नाकारत 'आप'च्या प्रामाणिक राजकारणाची निवड केली आहे. आपच्या सर्व विजयी उमेदवारांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन. यावेळी बदलासाठी पंजाब तयार आहे', असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

2016 मध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी 26 पैकी 20 जागा भाजप-अकाली दलाच्या युतीला मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 4 मिळाल्या होत्या. एक जागा अकाली, तर एक अपक्ष उमेदवार जिंकला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in