या सरकारमधील लोकांकडे पैसे खाण्याचं स्कीलसुद्धा नाही: चंद्रकांत पाटील
पुणे: ‘या सरकारमध्ये पैसे खाण्याशिवाय कुणालाच काही कळत नाही. पण पैसे खाण्याचं स्कीलसुद्धा यांच्याकडे नाही.’ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद बोलावली होती. ज्यावेळी त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते […]
ADVERTISEMENT

पुणे: ‘या सरकारमध्ये पैसे खाण्याशिवाय कुणालाच काही कळत नाही. पण पैसे खाण्याचं स्कीलसुद्धा यांच्याकडे नाही.’ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद बोलावली होती. ज्यावेळी त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीवर बरीच टीका केली.
पाहा चंद्रकांत पाटील नेमकं काय-काय म्हणाले:
किरीट सोमय्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप केल्यानंतर मुश्रीफांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या मागचे मास्टरमाईंड हे चंद्रकांत पाटील असल्याचं म्हटलं आहे. ज्यानंतर चंद्रकांत पाटलांनी देखील पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे.
‘पैसे खाण्याचं स्कीलसुद्धा यांच्याकडे नाही’