मुंबईच्या ‘बत्ती गुल’ प्रकरणामागे चीनचा हात
गेल्या वर्षी मुंबईत 12 ऑक्टोबरला वीज गायब झाली होती आणि मुंबईच्या लोकल यंत्रणेपासून ते हॉस्पिटलमधले व्हेंटिलेटर्सपर्यंत अनेक यंत्रणा कोलमडून पडण्याचा धोका होता. मुंबईच्या या ‘बत्ती गुल’ प्रकरणावर आता थेट अमेरिकेतल्य़ा न्यूयॉर्क टाईम्सने सविस्तर वृत्त प्रसिध्द केले आहे आणि या घटनेमागे चीनचा हात असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. हे वृत्त प्रसिध्द करताना न्यूयॉर्क टाईम्सने इंडिय़ा टुडेचा […]
ADVERTISEMENT

गेल्या वर्षी मुंबईत 12 ऑक्टोबरला वीज गायब झाली होती आणि मुंबईच्या लोकल यंत्रणेपासून ते हॉस्पिटलमधले व्हेंटिलेटर्सपर्यंत अनेक यंत्रणा कोलमडून पडण्याचा धोका होता. मुंबईच्या या ‘बत्ती गुल’ प्रकरणावर आता थेट अमेरिकेतल्य़ा न्यूयॉर्क टाईम्सने सविस्तर वृत्त प्रसिध्द केले आहे आणि या घटनेमागे चीनचा हात असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. हे वृत्त प्रसिध्द करताना न्यूयॉर्क टाईम्सने इंडिय़ा टुडेचा दाखली दिला होता.
गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबई शहरात वीज गायब झाली होती. हा खंडित झालेला वीजपुरवठा साधारण 10 ते 12 तासानंतर पूर्ववत झाला, पण वीजपुरवठा खंडित होण्य़ाचा हा प्रकार मुंबईत गेल्या कित्येक दशकात झाला नव्हता तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले होते.
न्यूयॉर्क टाईम्सच्या या वृत्तानुसार मुंबईतला वीज गायब होण्याचा प्रकारामागे चायनीज हॅकर्सचा हात असल्याची माहिती दिली आहे. भारतात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरले जाते त्या सॉफ्टवेअरमध्ये चीन हॅकर्सकडून मालवेअर (व्हायरस) सोडण्यात आले त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्य़ाचा प्रकार घडला.