Mumbai Tak /बातम्या / IPL 2023 च्या ऑक्शनमधून क्रिस वोक्सने घेतली माघार,’हे’ आहे कारण
बातम्या स्पोर्ट्स

IPL 2023 च्या ऑक्शनमधून क्रिस वोक्सने घेतली माघार,’हे’ आहे कारण

Chris Woakes out of IPL : देशात वुमेन्स प्रिमीयर लीगची (WPL) धुम सूरू आहे. या लीगमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहेत.या लीगनंतर लगेचच आयपीएलला सूरूवात होणार आहे. या लीगला सुरुवात होण्यापुर्वीच क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर क्रिस वोक्सने (Chris Woakes)आयपीएलमधून माघार घेतली आहे. टी20 तून टेस्टमध्ये खेळणे खुप अवघड जाते. तसेच इतर अनेक समस्या भेडसावतात, असे म्हणत वोक्सने आयपीएलमधून माघार घेतलीय.(chris woakes reveals why he opted out of ipl 2023 t20 to test quite big jump)

WPL : पोरींनी पहिल्याच फटक्यात केली कमाल… IPL मध्ये दिग्गजांनाही नव्हतं जमलं

माघार घेण्याचे कारण काय?

आयपीएल 2023 ला येत्या 1 मार्चला सूरूवात होणार आहे. या लीगपुर्वी क्रिस वोक्सने (Chris Woakes) आयपीएल 2023 ऑक्शनमधून आपले नाव परत घेतले आहे. या त्याच्या निर्णयावर त्याने प्रतिक्रियाही देखील दिली आहे. आयपीएलमधून बाहेर पडण्या मागची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, जेव्हा मी आयपीएल खेळून परत येतो, तेव्हा माझी बॉडी पुर्णपणे आकारत येत नाही. तसेच मला स्वत:ला फारसे बरे वाटत नाही,असे वोक्स म्हणतो. तसेच टी20 क्रिकेटमधून एकाएकी टेस्ट क्रिकेटमध्ये उडी घेणे माझ्यासाठी खुप कठीण जाते. मला टेस्ट क्रिकेट खेळून जवळ जवळ एका वर्षाहून अधित वेळ झाला आहे. त्यामुळे मला टीममध्ये सिलेक्ट होण्यासाठी काही चांगल्या ओव्हर्स टाकाव्या लागणार आहेत, असे म्हणत त्याने माघार घेण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

WPL : RCB चा सलग दुसरा पराभव, स्मृती मंधाना भडकली, ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार

आयपीएलमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू खेळायला येतात. तसेच आर्थिकरित्या ही स्पर्धा खुपच आकर्षित करणारी असते, असे वोक्स म्हणतात. 2023 मध्ये होणाऱ्या एशेज सीरीजसाठी मला स्वत:ला तयार करायचे आहे. क्रिस वोक्स (Chris Woakes) काउंटी चँम्पियनशीपमध्ये वॉर्कशायरकडून क्रिकेट खेळणार आहे,अशी माहिती आहे.

दरम्यान वोक्सने आतापर्यंत नवीन कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृ्त्वाखाली एकही मॅच खेळली नाही आहे. त्यामुळे आता त्याचे सिलेक्शन प्लेइंग ईलेव्हन होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वोक्सच्या या निर्णयानंतर अनेक क्रिकेट फॅन्सना धक्का बसला आहे. याआधी क्रिस वोक्स (Chris Woakes)आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट राईडर्स, दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चँलेंजर्स बंगळूरूकडून खेळला आहे.

ना कोहली ना सूर्यकुमार… एबी डिव्हिलियर्सने सांगितला T20तील बेस्ट खेळाडू

येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. 31 मार्चला पहिला सामना गुजरात जायंट्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये असणार आहे. दुसरा सामना पंजाब किंग्स विरूद्ध कोलकत्ता नाईट राईडर्स विरूद्ध असणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता असणार असून आता अवघे दिवसच उरले आहेत.

---------
Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना